कुणाल मराठे यांची नेहरू युवा केंद्राच्या सल्लागार समितीवर नियुक्ती

 0
कुणाल मराठे यांची नेहरू युवा केंद्राच्या सल्लागार समितीवर नियुक्ती

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव कुणाल मराठे यांची नेहरु युवा केंद्र संघटनेच्या जिल्हा सल्लागार समिती ,भारत सरकार सदस्य पदी नियुक्ति

औरंगाबाद, दि.24(डि-24 न्यूज) भाजपा, भारतीय महाराष्ट्र प्रदेश सचिव कुणाल मराठे यांची नेहरु युवा केंद्र संघटनेच्या जिल्हा सल्लागार समिती सदस्य या पदावर नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या या संघटनेच्या कार्यासाठी निवड झाल्याचे पत्र कुणाल मराठे याना प्रदान करण्यात आले. भारत सरकारच्या वतीने समाजसेवा, युवा कार्य, शिक्षण आणि संस्कृती या क्षेत्रात कार्य करणाऱ्या या संघटनेच्या माध्यमातून युवकांचे प्रश्न सोडवण्याची संधी प्राप्त झाल्याची भावना कुणाल मराठे यांनी व्यक्त केली.

भाजपच्या कार्यापासून सुरू झालेल्या त्यांचा प्रवास हा सतत चढता राहिला आहे. सामाजिक कार्याची आवड जोपासत राजकीय वलय निर्माण करणारे कुणाल मराठे सतत चर्चेत असतात. त्यातच ही नियुक्ती झाल्याने अधिक जोमाने कामाला लागतील असे त्यांच्या हितचिंतकांकडून सांगण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow