कृषी उच्चतम बाजार समीतीत अवैध प्लाॅट नोंदणी विरुध्द नोटीस बजावली - मोहम्मद असरार
कृषी बाजार समिती घोटाळ्यांची मालिका सुरूच - एमआयएम युवा अध्यक्ष मोहम्मद असरार
अवैध प्लॉट नोंदणीविरुद्ध नोटीस बजावली...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज) – जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीतील घोटाळ्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. ताज्या प्रकरणात प्लॉट नोंदणीसंबंधी दिशाभ्रमक माहिती मिळाल्याचे समोर आले आहे. कृषी समितीने केलेल्या नोंदणीकृत सर्व भूखंडांच्या रजिस्ट्री रद्द करण्याबाबत तसेच नागरिकांना गोंधळात टाकून फसविणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात उप निबंधक कार्यालयाने बाजार समितीचे प्राधिकृत सचिव विजय शिरसाठ आणि इतर पाच लोकांना नोटीस जारी केली आहे. पुढील कारवाईसाठी सह जिल्हा निबंधक वर्ग-1 आणि मुद्रांक जिल्हाधिकारी यांनाही सूचित केले आहे.
नोटीसमध्ये सांगितले आहे की, प्राप्त तक्रारी आणि पत्रांनुसार 2018 मध्ये तयार केलेल्या ले-आउटमधील ओपन स्पेसच्या अटींचे उल्लंघन बाजार समितीने केले आहे. ओपन स्पेसमध्ये प्लॉटची विक्री झाली आणि दस्तऐवजात चुकीची वाटणी दाखवण्यात आली. रिव्हाईज्ड प्लॅन मनपा ने मंजूर केले असल्याचा दावा केला गेला, परंतु कार्यालयाने स्पष्ट केले की प्रत्यक्षात असे कोणतेही मंजूर प्लॅन अस्तित्वात नाही. मनपानेही पत्राद्वारे सांगितले की, ही योजना कोणतीही सुधारित केलेली नाही, तरीही दस्तऐवजात असे नमूद केले गेले आहे की, ती सुधारित योजनेखाली झाली होती. या संदर्भात उप निबंधक कार्यालय क्रमांक 1 ने एआयएमआयएमचे युवा शहर अध्यक्ष मोहम्मद असरार यांनी दिनांक 19 मे, 2 व 11 जून रोजी केलेले पत्र तसेच कार्यालयात 18, 23 व 30 जुलै रोजी झालेल्या सुनावणीचा उल्लेख केला आहे.
दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी सह दुय्यम निबंधक वर्ग-2, छत्रपती संभाजीनगर क्रमांक 1 या कार्यालयात जाधववाडी येथील सर्वे नंबर 7/5 मधील तिसऱ्या टप्प्यातील अनेक भूखंडांचे ‘लीज डीड’ नावाचे दस्तऐवज नोंदणीस आले आहेत. त्यामध्ये पुढील प्लॉट्स समाविष्ट आहेत:
दस्त नं. 6873/2023, प्लॉट नं. 85, क्षेत्रफळ 154.36 वर्ग मीटर (1661 वर्ग फूट). दस्त नं. 6874/2023, प्लॉट नं. 86, क्षेत्रफळ 154.36 वर्ग मीटर (1661 वर्ग फूट). दस्त नं. 6875/2023, प्लॉट नं. 88, क्षेत्रफळ 306.78 वर्ग मीटर (3301 वर्ग फूट). दस्त नं. 6900/2023, प्लॉट नं. 99, क्षेत्रफळ 143.77 वर्ग मीटर (1547 वर्ग फूट). दस्त नं. 6880/2023, प्लॉट नं. 100, क्षेत्रफळ 122.49 वर्ग मीटर (1318 वर्ग फूट)
उप निबंधकानी बाजार समितीच्या सचिवासह या पाच लोकांना 15 दिवसांच्या आत कार्यालयात उपस्थित राहून पुरावे सादर करत लेखी स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. निर्देशांचे पालन न केल्यास नोंदणी अधिनियम 1908 च्या कलम 82 व 83 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.
प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणातील संबंधित लोकांची संख्या पाचवरून पन्नासपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. नोटीसमधून स्पष्ट होते की, नागरिकांना गोंधळात टाकून सरकारी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बाजार समितीवर कडक कारवाई करण्याची तयारी सुरू झाली आहे.
What's Your Reaction?