कृषी उत्पन्न बाजार समितीवर मंत्री अब्दुल सत्तार यांची एकहाती सत्ता, विरोधी पॅनलचा उडाला धुव्वा
सिल्लोड कृषि उत्पन्न बाजार समितीवर पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम...
सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पॅनलचे 18 पैकी 18 उमेदवारांचा दणदणीत विजय
ऐतिहासिक विजय ; मंत्री अब्दुल सत्तार यांची बाजार समितीवर एकहाती सत्ता
सिल्लोड,दि.29(डि-24 न्यूज) कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड - सोयगाव संचालक मंडळाच्या निवडणुकीत राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री तथा सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी एकहाती सत्ता प्रस्थापित करून बाजार समितीवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत मंत्री अब्दुल सत्तार यांच्या जय श्रीराम विकास पॅनलचे 18 पैकी 18 उमेदवारांचा प्रचंड मतांनी दणदणीत विजय झाला आहे.
जल्लोष,फटाक्यांची आतषबाजी आणि विजयी मिरवणूक...
निवडणूक निकालाची घोषणा होताच सिल्लोड येथील मतमोजणी केंद्र असलेल्या शेवंताबाई मंगल कार्यालय येथे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी तसेच एकमेकांना पेढा भरवून कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. ढोलताशे आणि घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता. याप्रसंगी अब्दुल सत्तार यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. त्यानंतर निघालेल्या विजयी मिरवणुकीत मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह विजयी उमेदवार तसेच कार्यकर्ते पदाधिकारी प्रचंड संख्येने उपस्थित होते.
विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते...
केशवराव यादवराव तायडे - 762,
दामोधर रामराव गव्हाणे - 746,
प्रभाकर दयाळराव काळे - 743,
जयराम आनंदा चिंचपुरे - 726,
श्रीरंग आनंदराव साळवे - 723,
अरुण भिकणराव शिंदे - 721,
सुनील सुंदरलाल पाटणी - 677,
अनुसयाबाई कौतिकराव मोरे - 820,
शालिनी नानासाहेब रहाटे - 761,
नंदकिशोर विठ्ठलराव सहारे - 812,
सतीश हरिदास ताठे - 775,
दारासिंग बंडू चव्हाण - 775,
विश्वास संपत दाभाडे - 755,
राजाराम म्हतारजी पाडळे - 769,
संदीप एकनाथ राऊत - 793,
रमेश मदनलाल राठी - 633,
भावराव पाराजी लोखंडे - 578,
शेख जावेद शेख जहीर - 877,
विरोधी पॅनलचा दारुण पराभव...
या निवडणुकीत विरोधी पॅनलचा दारुण पराभव झाला. मंत्री अब्दुल सत्तार यांचा दांडगा जनसंपर्क, केलेला विकास, त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणाऱ्या बाजार समितीचा विकास यापुढे विरोधी पॅनल टिकू शकले नाही. सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीत पहिल्यांदा विलीन झालेल्या सोयगाव तालुक्यातून मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पॅनलला मतांची प्रचंड आघाडी मिळाली.
सहकार क्षेत्रात मंत्री अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व...
गेल्या दोन महिन्यात झालेल्या सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये सहकारी जिनिंग प्रेसिंग, खरेदी विक्री संघ यासह एकूण 7 संस्थेवर अब्दुल सत्तार यांनी बिनविरोध बाजी मारली. त्यानंतर आज झालेल्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांच्या पॅनलचे 18 पैकी 18 उमेदवार निवडून आल्याने अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा सहकार क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय सेना भवन येथे विजयी मिरवणुकीचा समारोप झाला. यावेळी अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
कृषी उत्पन्न बाजार समितीचा विजय हा कार्यकर्त्यांचा आणि मतदारांच्या विश्वासाचा विजय असल्याचे प्रतिपादन यावेळी अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. बाजार समितीच्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवून दिल्याबद्दल अब्दुल सत्तार यांनी मतदारांचे आभार मानले.
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी बाजार समिती सह मतदार संघात विकास कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला, याबद्दल अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे आभार मानले.
मार्केट कमिटी स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा मार्केट कमिटीवर एकहाती आणि प्रचंड मतांनी मतदारांनी सत्ता दिली आहे. नवनिर्वाचित संचालक हे विश्वासाला पात्र ठरतील, शेतकरी आणि बाजार समितीच्या विकासासाठी त्यांचा कायम प्रयत्न असेल असे अब्दुल सत्तार म्हणाले.
बाजार समितीच्या माध्यमातून गाव तेथे गोडाऊन, बनकिन्होळा येथे कोल्ड स्टोरेज, आमठाणा , सावळदबारा आणि बनोटी येथे उपबाजार लवकरच उभारणार असल्याची घोषणा यावेळी अब्दुल सत्तार यांनी केली.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, युवासेनेचे धैर्यशील तायडे, शेख इम्रान, अक्षय मगर यांच्यासह शिवसेना युवासेना पदाधि
कारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?