केंद्रीय अर्थसंकल्पावर काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे यांची प्रतिक्रिया...!

केंद्रीय अर्थसंकल्पावर काँग्रेसचे खा.डाॅ.कल्याण काळे यांची प्रतिक्रिया...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज) आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. जालन्याचे काँग्रेसचे खासदार डॉ कल्याण काळे यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले
प्राप्तिकरात सूट देण्याची मर्यादा वाढविल्याचे जाहीर केले. मात्र त्यातून फारसे काही साध्य होईल, असे दिसत नाही. प्राप्तिकर परतावा भरणाऱ्यांची संख्या वाढेल. त्यातून मिळणारा महसूल सरकारला वाढून मिळेल. उदाहरणार्थ एखाद्या गावातून सात लाखांची उत्पन्न मर्यादा असणाऱ्यांपैकी एक लाख जण रिटर्न दाखल करत असतील तर तेथील संख्या पाच लाख होईल त्यातून मिनिमम चलानचे पैसे सरकारसाठी वाढतील. थोडक्यात दिवसाढवळ्या डोळ्यात अंजन घालण्याचा हा प्रकार आहे.
2028 पर्यंत हर घर जलची घोषणा केली गेली. जलजीवन मिशन अभियान राबविणे सुरु झाल्यापासून प्रत्यक्षात किती गावांतील घरांना पाणी मिळाले, याची तपासणीही होणे आवश्यक आहे. आपल्या राज्यातील बहुतांश गावात योजनेंतर्गत 70 टक्के बजेट खर्च झाले पण अजून गावात पाणी पोचलेले नाही. अशी परिस्थिती असेल तर आता दिलेले उद्दिष्ट कसे पूर्ण होणार ? हा प्रश्न आहे. अर्थसंकल्पात गेल्या तीन, चार वेळेप्रमाणे दावे मोठे केले, त्याच्या अंमलबजावणीबाबत ठोस काय याबाबत मात्र कुठे योग्य समाधान दिसत नाही. शेतकरी, व्यापारी, सामान्य नागरिकांची एकाअर्थाने निराशा झाली आहे, असे म्हणावे लागेल. शेतकरी कर्जमाफी अपेक्षित होती. शेतमालाच्या हमीभावाबद्दल ठोस काहीच नाही. आकड्यांचा खेळ आणि गोलमाल आहे. मनरेगाच्या निधीची कपात केल्याचे सकृतदर्शनी दिसते. अर्थसंकल्पात रोजगार निर्मिती व नोकऱ्यांसदर्भात ठोस धोरण नाही.
What's Your Reaction?






