कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात झटपट नोकरी...
 
                                कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा उपक्रम;
झटपट नोकरीसाठी उद्या (दि.25) ‘जागेवर निवड संधी’ विशेष मोहिम
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज)- जिल्हा कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे ‘जागेवर निवड संधी’ (प्लेसमेंट ड्राईव्ह) चे गुरुवार दि.25 रोजी आयोजन करण्यात आले आहे. विभागाच्या छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयातच हा उपक्रम राबविला जाणार असून इच्छुक तरुण तरुणींनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.
जिल्हा कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयातच गुरुवार दि.25 रोजी सकाळी साडेनू ते दुपारी २ यावेळात थेट मुलाखती घेतल्या जातील. जिल्ह्यातील युवक युवतींना विविध खाजगी कंपन्या, कारखाने उद्योग व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडी रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित विविध कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून 128 रिक्तपदांकरीता मुलाखती घेणार आहेत. यासाठी शैक्षणीक पात्रता 10 वी, 12 वी, आयटीआय पास, डिप्लोमा व कोणत्याही शाखेचा पदवीधर अशा पात्रतेच्या जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या मोहिमेत सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध रिक्तपदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्ड ने लॉग इन होऊन ऑनलाईन अप्लाय करावे किंवा बायोडाटाच्या ६ प्रती घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
संकेतस्थळावर नोंदणी करताना अथवा रिक्तपदासाठी अप्लाय करताना काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी क्रंमांक 0240-2954859 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त रोजगार इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहून पात्रतेप्रमाणे विविध नियोक्तयांकडे मुलाखती देवून रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            