क्रांतीचौक येथे तिरंगा रॅलीचे आयोजन...

क्रांती चौक येथे तिरंगा रॅलीचे आयोजन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि 14(डि-24 न्यूज) - सांस्कृतिक कार्य भारत सरकार नवी दिल्ली व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार देशभर दिनांक 2 ऑगस्ट 2025 पासून ते 15 ऑगस्ट 2000 25 पर्यंत भारतभर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी क्रांती चौक येथे तिरंगा यात्रा, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा प्रश्नमंजुषा, तिरंगा प्रकाशयोजना व सजावट, तिरंगा महोत्सव, आदी कार्यक्रम क्रांती चौक येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी संतोष वाहुळे नियंत्रण अधिकारी अतिक्रमण विभाग ,अंकुश पांढरे उपायुक्त, नंदकुमार होंगे, अपर्णा थेटे उपायुक्त, लखीचंद चव्हाण उपायुक्त, शिवाजी नाईकवाडे, मुख्य लेखा परीक्षक, मनोज गर्जे उपसंचालक नगर रचना, डॉ.पारस मंडलेचा मुख्य वैद्यकीय अधिकारी, फारुख खान शहर अभियंता, अनिल तनपुरे कार्यकारी अभियंता, विकास नवाळे, संजय चामले मालमत्ताधिकारी, अशोक तीन गोटे शिक्षणाधिकारी, शंभू विश्वासू सांस्कृतिक कार्य अधिकारी यांच्या उपस्थितीत तिरंगा मंचावर राष्ट्रीय ध्वज फडकावून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळेस संतोष वाहुळे यांनी सर्वांना तिरंगा प्रतिज्ञा दिली. महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व नृत्य सादर केले. महानगरपालिकेने निर्मित केलेल्या बँडवर विविध संगीतमय गीत देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले. महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेशभूषेतील देखावा करून सजवलेल्या रथामध्ये त्यांना बसवून सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी व शहरातील नागरिकांच्या हातामध्ये तिरंगा ध्वज देऊन क्रांती चौक पासून ते संत एकनाथ मंदिर पर्यंत तिरंगा यात्रा काढण्यात आली.
यामध्ये लखीचंद चव्हाण, संजय चामले, मुख्य लेखापरीक्षक शिवाजी नाईकवाडे आदी अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत विद्यार्थी व शहरवासी तिरंगा रॅलीमध्ये चालत होते. यावेळेस मोठ्या प्रमाणात जयघोष देऊन परिसर दणाणून सोडले. संत एकनाथ रंग मंदिर येथे मिरवणूक समाप्त झाल्यानंतर देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन लखीचंद चव्हाण, संजय चामले यांनी उद्घाटन केल्यानंतर महानगरपालिका आणि मनपा शाळा कार्यक्रम संपन्न झाले. यावेळेस मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी कर्मचारी अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
What's Your Reaction?






