खुलताबाद सुफी संताची भुमी, हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक- अंबादास दानवे

खुलताबाद सुफी संताची भुमी, हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक- अंबादास दानवे
दानवेंनी जर जरी बक्ष मजारवर चादर चढवत द्वेष मिटवण्याची केली कामना
खुलताबाद,दि.29(डि-24 न्यूज) प्रेषित मोहंमद पैगंबर (स.अ.व.स.) यांनी जगाला समतेचा व प्रेम सदभावाचा संदेश दिला. खुलताबाद भुमित अनेक सुफी संतांनी धार्मिक एकतेचा संदेश दिला. हि पवित्र भुमी हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक-आहे. एके बाजूने घृष्णेश्वर मंदिर आहे तर दुसरीकडे हजरत जर जरी बक्ष दर्गाह. देशात सध्या द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणून आता प्रेमाचा संदेश देत देशाच्या प्रगतीसाठी एकजूट दाखवण्याची गरज आहे असे प्रतिपादन विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे.
आज सकाळी ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने खुलताबाद येथील हजरत जर जरी जर बक्ष दर्गाहवर हाजरी लावत त्यांनी शिवसैनिकांसोबत चादर चढवली. देशात व राज्यात सुख समृद्धी लाभो अशी कामना केली.
यावेळी दर्गाह परिसराच्या विकासासाठी प्रस्ताव सादर करण्याची विनंती दानवे यांनी कमेटीला केली. याप्रसंगी दर्गाह कमेटीचे अध्यक्ष एजाज अहमद यांनी दानवेंचे सुफी परंपरागत पद्धतीने फेटा बांधून स्वागत केले.
याप्रसंगी मा. नगराध्यक्ष अब्दुल कमर, मा.नगराध्यक्ष एड कैसरोद्दीन, मुजीबुर्रहेमान, मतिन जागिरदार, मो. नईम, इम्रान जागिरदार, फजिकत अहेमद, शिवसेना तालुकाप्रमुख राजु वरकड, शरीफ देशमुख ,समद टेलर, शेख रब्बानी, समीर कुरेशी, मनोहर लाळे, फकीरचंद काळे, विष्णू फुलारे, बाबासाहेब बारगळ, पोपट वेताळ, महेश महालकर, विनोद जाधव, राॅकी पुरंदरे, विजय चौधरी उपस्थित हो
ते.
What's Your Reaction?






