गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनदान, फळे वाटप करुन राहुल कनालचा वाढदिवस साजरा
गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनदान, फळे वाटप करुन राहुल कनालचा वाढदिवस साजरा
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.25(डि-24 न्यूज) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोशलमिडीया प्रमुख तथा युवासेनेचे नेते राहुल एन कनाल यांचा आज वाढदिवस. या निमित्ताने शासकीय कर्करोग रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय(घाटी) रुग्णालयात गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनदान व फळे वाटप करुन वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा करण्यात आला होता. आय लव्ह औरंगाबाद फाऊंडेशनचे अध्यक्ष इरबाज अन्सारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी शेख तौफिक, सुभम साठे, शारेक काझी, अब्दुल मलिक, हसर आमेर खान, मजहर खान, प्रितम लोहाडे आदी उपस्थित होते
.
What's Your Reaction?