गावातील पोलिस पाटील बसले उपोषणाला, मानधनात वाढ करण्याची मागणी
गावातील पोलिस पाटील बसले उपोषणाला, मानधनात वाढ करण्याची मागणी
औरंगाबाद, दि.9(डि-24 न्यूज) राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करावी या मागणीसाठी 6 नोव्हेंबर पासून जिल्हाध्यक्ष अशोक दादासाहेब ठोंबरे आमरण उपोषणाला बसले आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हे उपोषण मागिल तीन दिवसांपासून सुरू आहे. मागिल वर्षी डिसेंबर महिन्यांत भव्य मोर्चा हिवाळी अधिवेशनात काढला होता. गृहमंत्र्यांनी मागणी पूर्ण करण्यासाठी आश्वासन दिले होते आतापर्यंत मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेतला नाही म्हणून उपोषण सुरु केले आहे.
पोलिस पाटलांना दरमहा 25 हजार रुपये मानधन देण्यात यावे. नुतनीकरणाची अट रद्द करावी. पोलिस स्टेशन असलेल्या गावांमध्ये पोलिस पाटील पद कायम ठेवण्यात यावे. निवृत्ती वयोमर्यादा 60 वरुन 65 वर्षे करण्यात यावी. महाराष्ट्र ग्राम पोलिस पाटील अधिनियम 1967 दुरुस्त करून सुधारित आदेश काढण्यात यावे. कर्तव्य बजावताना मृत्यू पावल्यास वारसांना अनुकंपा तत्त्वावर पोलिस पाटील पदी नेमणूक करावी. पोलिस पाटलांच्या मुलांना पोलिस पाटील भरतीमध्ये प्राधान्य द्यावे. सेवा समाप्त झाल्यास त्यांना पेन्शन देण्यात यावी अथवा एकरकमी दहा लाख रुपये देण्यात यावे. नक्षलवादी भागांमध्ये पोलिस पाटील शहीद झाल्यास वारसांना 20 लाख रुपये देण्यात यावे व अतिदुर्गम भागातील पोलिस पाटलांना प्रवासभत्ता दुप्पट करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
What's Your Reaction?