गॅस टंचाई व काळाबाजार विरोधात शिवसेनेचे तीव्र आंदोलन...
गॅस टंचाई व काळाबाजार विरोधात शिवसेनेचे तीव्र आंदोलन...
शिवसेना नेते अंबादास दानवेंच्या तत्परतेने अवैध विक्रीवर गुन्हा दाखल...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज)-: छत्रपती संभाजीनगरात घरगुती व व्यावसायिक गॅस टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून, गॅस सिलिंडरचा खुलेआम काळाबाजार सुरू असल्याने शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आज 27 मार्च रोजी जोरदार आंदोलन करण्यात आले.
शहरातील तब्बल 23 गॅस एजन्सींना निवेदन देत, चढ्या दराने गॅस विक्री करणाऱ्या एजन्सी धारकांना जाब विचारण्यात आला. घरगुती व व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत व नियमित करावा, शासनाने निश्चित केलेल्या दरानुसारच विक्री करावी, काळाबाजार तात्काळ थांबवावा, तसेच नागरिकांना वेळेवर होम डिलिव्हरी सेवा उपलब्ध करून द्यावी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
दरम्यान, मयूर पार्क परिसरात भारत गॅस एजन्सीची एक गाडी शिवसैनिकांनी पकडली. निवासी भागात अवैध पद्धतीने गॅसची विक्री सुरू असल्याचे आढळून आल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक स्वाती स्वप्नील खाडे-केदार यांनी कारवाई करत, अवैध विक्री व चढ्या दराने गॅस विक्री केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला. ही गाडी शिवसेना मध्य शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांनी पकडली होती.
यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. गॅस टंचाई तात्काळ दूर करावी, काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांना सुरळीत गॅस पुरवठा करावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना उपनेते सुभाष पाटील, सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे, उपजिल्हाप्रमुख संतोष खेंडके, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, हरिभाऊ हिवाळे, दिग्विजय शेरखाने, विधानसभा प्रमुख प्रमोद ठेंगडे, विधानसभा संघटक गिरीश चपळगावकर, महिला आघाडी संपर्क संघटक सुनिता आऊलवार, जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, उपजिल्हा संघटक अरुणा भाटी, मीरा देशपांडे, रेणुका जोशी, मा. नगरसेवक वीरभद्र गादगे, उपशहर प्रमुख मंगेश भाले, रवी गायकवाड, विजया पवार, छाया देवराज, मधुकर वाघमारे, सचिन कापसे, पंकज पाषाण, राजु खंडागळे, शिवकुमार देशमुख, गजानन बिडवे, प्रशांत अकोलकर, शेखर काळे, अशोक राऊत, चंद्रकांत देवराज, रवींद्र तांगडे, पृथ्वीराज राठोड, कुणाल पाठक, अंकुश देवरे, सम्राट वानखेडे, आनंद कुलकर्णी, संतोष दीक्षित, बसवराव राजपूत, गोकुळ राजपूत, बापू चौधरी, आनंद अंभोरे, विजय बुरगुंडे, मोहित श्रीवास्तव, नितीन मोहीते, प्रकाश दुरे, ऋषिकेश जाधव, प्राजक्ता भाले, सीमा गवळी, राजश्री पोफळे व दिपीका देशमुख
उपस्थित होते.
What's Your Reaction?