ग्रामीण भागात एमआयएमची इंट्री, जिल्हा परिषद, पंचायत समितीत उमेदवार देणार...!
ग्रामीण भागात एमआयएमची इंट्री, जिल्हा परिषद, पंचायत समितीत देणार उमेदवार...!
भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीला देणार आव्हान, समविचारी पक्षांनी प्रस्ताव दिल्यास युती करण्याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील...घराणेशाहीला देणार आव्हान...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) - महापालिका निवडणुकीत एमआयएमचा दनदनीत विजय मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असल्याने ग्रामीण भागात आता एमआयएमची इंट्री होणार असल्याने राजकारण अधिक तापणार आहे. 29 महानगरपालिका निवडणुकीत 125, नगरपरिषदेत 83 नगरसेवक, एक नगराध्यक्ष निवडून आल्याने प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल यांनी आज पदाधिकारी यांची बैठक घेऊन 5 फेब्रुवारी रोजी 12 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपल्या पक्षाचे उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरी भागात पक्षाचा विस्तार झाला आता ग्रामीण भागातील विकासासाठी पक्षाचे संघटन जेथे आहे तेथे उमेदवार रिंगणात उतरवले जाईल अशी माहिती पत्रकार परिषदेत एमआयएमचे नेते नासेर सिद्दीकी व शारेक नक्शबंदी यांनी दिली आहे.
उद्यापासून छत्रपती संभाजीनगर येथील इम्तियाज जलिल यांच्या दिल्लीगेट येथील संपर्क कार्यालयात उद्यापासून सकाळी दहा वाजेपासून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहे. हि मुलाखती घेण्यासाठी समितीतील सदस्य नासेर सिद्दीकी, शारेक नक्शबंदी, शेख अहेमद, विकास एडके, कुणाल खरात हे घेणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आ
हे.
What's Your Reaction?