चंपा चौक ते रोशन गेट पर्यंत शनिवारी अतिक्रमण हटाव पथकाची कारवाई होणार...!
चंपा चौक ते रोशन गेटपर्यंत शनिवारी अतिक्रमण हटाव मोहीम
महापालिकेचा अतिक्रमणधारकांना इशारा; टिनशेड व हातगाड्या हटवून घेण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15 (डि-24 न्यूज) : शहरातील गजबजलेल्या चंपा चौक ते रोशन गेट या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार शनिवारी अतिक्रमण हटाव पथकाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
चंपा चौक ते रोशन गेट या मार्गावरील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाबाबत महापालिका व वाहतूक विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत महापालिकेचे अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे व संबंधित अधिकाऱ्यांनी चंपा चौक परिसरातील रस्त्याची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
या पाहणीदरम्यान, रस्त्यावरील अतिक्रमणे, टिनशेड आणि हातगाड्या स्वतःहून हटवून घेण्याचे आवाहन करण्यात आले. संबंधितांनी अतिक्रमणे काढून न घेतल्यास शनिवारी अतिक्रमण हटाव पथकाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, सहायक आयुक्त सुरडकर, 'क' प्रभागाचे सहायक आयुक्त रफीक शेख तसेच अतिक्रमण हटाव पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित
होते.
What's Your Reaction?