चिकलठाण्यात अतिक्रमण नसताना मदरशाचे टिन शेड पाडून केले 8 लाखांचे नुकसान

चिकलठाण्यात अतिक्रमण नसताना मदरशाचे टिन शेड पाडून केले 8 लाखांचे नुकसान...
मुस्लिम समाजात संतापाची लाट, कमिटी व निवासी नागरीकांनी अतिराक्त आयुक्त रणजित पाटील यांची भेट घेवून केली नुकसान भरपाईची मागणी, दिले चार दिवसांचे अल्टिमेटम...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज)
शहरातील चिकलठाणा गावात महापालिकेच्या अतिक्रमण हटावो पथकाची मोठा फौजफाटा घेवून मोठी कार्यवाई करुन सर्व्हिस रोडचा श्वास मोकळा केला. या कार्यवाईचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे परंतु अतिक्रमण नसताना मुस्लिम धार्मिक स्थळाच्या जागेवर मुले शिक्षण घेत असलेल्या टिन शेड या कार्यवाईत पाडून आठ लाखांचे नुकसान करण्यात आले. या शेडमध्ये मुलांसाठी भोजन बनवण्यासाठी किचनची पण नासधुस करण्यात आल्याने मुस्लिम समाजात संतापाची लाट पसरली आहे. जाणूनबुजून हि कार्यवाही करण्यात आली असा आरोप कमेटीने केला आहे.
नुकसानभरपाईची मागणी कमिटीच्या वतीने अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्याकडे भेट घेवून करण्यात आली आहे. संबंधित कार्यवाही करणारे अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करुन त्यांच्यावरही कार्यवाईची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे मौजे चिकलठाणा येथील जुने धार्मिक स्थळ ग्रेव्हयार्ड दर्गा स. सादात मस्जिद व दिनी मदरसा अशी नोंदणी वक्फ संस्था असून पूर्ण संस्थेचे व्यवस्थापन हाजी सत्तार कुरेशी यांच्या ताब्यात आहे. संस्थेचा वाद वक्फ ट्रिब्युनल न्यायालयात न्यायप्रविष्ट असून या टिन शेडमध्ये लहान मुला मुलींची शाळा चालते. त्यांना जेवणासाठी गावचंदा करुन मदरशाचे खालील कोप-यात आठ लाख रुपये खर्च करुन टिन शेड तयार करुन भोजन व्यवस्था केली होती. शेड हा दर्गा पासून अंदाजे 159 फुटांच्या लांबीवर आहे. त्या शेडचा रोडचा काही संबंध येत नाही. किंवा रोडला बाधा येईल हा प्रश्न नसताना 28 जून 2025 रोजी टिन शेडला महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिका-यांनी हे शेड उध्वस्त केले आहे. कमिटीच्या जवाबदारांना विचारले सुध्दा नाही थेट बुलडोझर चालवण्याचा आरोप कमेटीने केला आहे. त्यांना हाजी सत्तार कुरेशी व इतर जवाबदार नागरीक त्यांना समजावत होते हि मालमत्ता वक्फ मंडळाची आहे. याचा व रोडचा काही एक संबंध नाही. शेड तोडू नका असे सांगितले असताना अतिक्रमण अधिकारी ऐकायला तयार नव्हते. चार दिवसांच्या आत मनपाने आठ लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी नसता न्यायालयात जाण्याचा इशारा कमेटीने दिला आहे.
यावेळी हाजी अब्दुल सत्तार कुरेशी, हाजी इसा कुरेशी, माजी खासदार इम्तियाज जलिल, सलिम पटेल वाहेगावकर, मौलाना रियाज, हाजी अनिस, युसुफ भाई, अजमत पठाण यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?






