जगामध्ये शांतता नांदावी यासाठी 17 फेब्रुवारी रोजी शांतता परिषदेचे आयोजन पोलिस आयुक्तांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन
जगामध्ये शांतता नांदावी, शांततेचे वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने
17 फेब्रुवारी रोजी रोटरी क्लब तर्फे शांतता परिषदेचे आयोजन...
5 देशाचे प्रतिनिधी लावणार हजेरी...
औरंगाबाद, दि.13(डि-24 न्यूज) रोटरी डिस्ट्रिकट 3132 च्या पुढाकाराने रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रो तर्फे शनिवार 17 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हॉटेल विटस, वेदांत नगर, औरंगाबाद येथे शांतता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्याचे उद्घाटन दिप प्रज्वल करून शहराचे पोलिस आयुक्त मनोज लोहीया हे करतील, तर सदरील परिषदेस 5 देशाचे प्रतिनिधी उपस्थीत राहतील.
रोटरीचे प्रकल्प प्रशिक्षण प्रदान करत असतात व समाजस्य वाढवतात आणि समाजास संघर्ष सोडवण्याची कौशल्य प्रदान करत असतात. शांतता निर्माण करण्यासाठी रोटरी वचनबद्ध आहे, आज नविन आव्हानांना उत्तर शोधुन मार्ग काढत आहे. जास्तीत जास्त संभाव्य प्रभाव कसा निर्माण करू शकु आणि चिरस्थायी बदलाची दृष्टी कशी साध्य करता येईल यासाठी रोटरी सतत प्रयत्नशिल असते, या उद्देशाने सदरील परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. या परिषदेसाठी भारतासह बंगलादेश, मलेशिया, नेपाळ व श्रीलंकेचे रोटरीचे प्रतिनिधी उपस्थीत राहणार आहे.
या परिषदेत नेपाळचे रो. मोहन कृष्णा श्रेष्ठा, मलेशियाच्या रो. बिन्दी राजसेगरन, श्रीलंकेचे समन गुनवरदना, आपले विचार मांडतील, तसेच शहराच्या रो. सौ. मोना भुमकर – मुलांवर संस्कार, ऋतुजा सोमाणी – शिक्षणातुन शांततेचे धडे, प्रोफेसर तनवीर अहमद – सोशल मिडिया व संघर्ष आणि नागपुरच्या रो. जयश्री छाब्रानी, डॉ. अभा झा हे शांततेसाठी महिलांचा सहभाग आवश्यक, या रोटरीचे शांततेसाठीच्या विविध कार्यक्रमाची ओळख करून देतील.
सकाळी 10 वाजता हॉटेल विटस येथे उद्घाटन कार्यक्रम होईल सदरील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शहराचे पोलिस अधिक्षक मनोज लोहीया हे उपस्थीत राहणार आहे, उद्घाटन सोहळा सकाळी 10 ते 11.30 दरम्यान होईल तर दुसरे सत्र 12.45 ते 2 वाजेपर्यंत, तिसरे सत्र 2.45 ते 3.30 तर चौथे सत्र 4 ते 4.45 पर्यंत आणि त्यानंतर निरोप समारंभ होईल व शेवटी ऋतुरंग सांस्कृतीक कार्यक्रम रात्री 8 ते 10 वाजे दरम्यान आयोजित केला असून जागतिक किर्तीच्या आरती पाटणकर अय्यंगार प्रस्तुत हसिल ए मेहफिल गजल कार्यक्रम सादर करतील. या कार्यक्रमासोबत कलादालन हस्तकचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, सकाळी 9 ते रात्री 9 हे प्रदर्शन सुरू असणार आहे. निवडक व अप्रतिम हस्तकलेच्या प्रदर्शनास सर्वांनी जरूर भेट द्यावी.
रोटरी इंटरनॅशनल ही एक अंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था आहे. एकुण 34 हजार हून अधिक रोटरी क्लबस् व 12 लक्ष सदस्यांच्या माध्यमातुन जगामध्ये शांतता नांदावी, शांततेचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी सतत प्रयत्नशील असते.
रोटरी एक मानवतावादी संस्था म्हणून ओळख आहे. शांतता ही रोटरीच्या ध्येयाची आधारशिला आहे. जेव्हा लोक आपल्या समाजात शांतता निर्माण करण्यासाठी कार्य करतात तेव्हा त्या बदलाचा जागतिक परिणाम होऊ शकतो असा रोटरीचा विश्वास आहे.
जगभरातील सर्व रोटरी क्लबस् अनेक सेवा प्रकल्प राबवून आणि शांतता फेलोशिप आणि शिष्यवृत्तींना समर्थन देऊन, गरिबी, भेदभाव, वांशिक तणाव, शिक्षणाचा अभाव आणि संसाधनांचे असमान वितरण यासह संघर्षाची मूळ कारणे दूर करण्यासाठी कृतीशील असतात.
सदरील कार्यक्रमात प्रवेश सर्वांसाठी खुला आहे. तरी जास्तीत जास्त जनतेने याचा लाभ घ्यावा, अशी माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये रोटरीच्या अध्यक्षा आरती पाटणकर, मिलिंद देशपांडे, हसन सिद्दीकी, प्रिया शेंडे, रागिणी कंदाकुरे, मोना भुमकर, चंद्रकांत चौधरी यांनी दिली.
What's Your Reaction?