जटवाडा रोडवरील रहदारीला अडथळा निर्माण करणारे विजेचे खांब हटवण्यासाठी कामाला गती, अधिकाऱ्यांनी केली पाहणी...

 0
जटवाडा रोडवरील रहदारीला अडथळा निर्माण करणारे विजेचे खांब हटवण्यासाठी कामाला गती, अधिकाऱ्यांनी केली पाहणी...

जटवाडा रोडवरील रहदारीला अडथळा निर्माण करणारे विजेचे खांब हटवण्यासाठी कामाला गती... अधिका-यांनी केली पाहणी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज)- हर्सुल जेल ते जटवाडा रोड सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम करत असताना रहदारीला अडथळा निर्माण करणारे विजेचे खांब न काढता ठेकेदाराने रस्ता बनवला. यामुळे दररोज या रस्त्यावर अपघात होत आहेत. आमदार प्रदीप जैस्वाल यांनी नागरिकांची तक्रार आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका व महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुनावले त्यानंतर प्रशासन झोपेतून जागे झाले. यानंतर हे विजेचे खांब हटवण्याच्या कामाला गती मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सोनटक्के व जोशी आणि महावितरणचे अधिकारी यांनी रस्त्याची पाहणी केली. दोन दिवसांत काम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या कंपनीला विजेचे खांब हटवण्याचे काम मिळाले लिनियर इंटरप्रायजेसचे इंजिनिअर शिवाजी किसे उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow