जायकवाडी धरणात 73.68 टक्के जलसाठा, आवक सुरुच
नाथसागर जलाशयात 73.68 टक्के उपयुक्त पाणीसाठा; 24 तासांत 44,574 क्युसेक पाण्याची आवक
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज) - पैठण येथील नाथसागर (जायकवाडी) धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून शुक्रवार (31 जुलै) रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत धरणात 1,599.458 दलघमी इतका जिवंत पाणीसाठा उपलब्ध असून तो 73.68 टक्के इतका आहे.
धरणाची पाणीपातळी 462.324 मीटर (1516.81 फूट) इतकी नोंदविण्यात आली आहे. धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता 2337.564 दलघमी आहे.
मागील वर्षी याच दिवशी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 1,975.178 दलघमी (90.98 टक्के) इतका होता. त्यामुळे यंदाच्या तुलनेत धरणातील पाणीसाठा कमी असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या 24 तासांत धरण परिसरात 60 मिमी पावसाची नोंद झाली असून, हंगामातील एकूण पर्जन्यमान 166 मिमी इतके झाले आहे. या कालावधीत धरणात 44,574 क्युसेक पाण्याची आवक झाली.
सध्या धरणाच्या डाव्या कालव्यातून 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, उजव्या कालव्यातून, जलविद्युत केंद्रातून तसेच सांडव्यातून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.
What's Your Reaction?