जालन्याचे मोटार मेकानिकची दुसरी मुलगीही बनणार डाॅक्टर, लागला नंबर...

 0
जालन्याचे मोटार मेकानिकची दुसरी मुलगीही बनणार डाॅक्टर,  लागला नंबर...

जालन्याचे मोटार मेकानिकची दुसरी मुलगीही बनणार डाॅक्टर, लागला नंबर...

जालना, दि.31(डि-24 न्यूज)-

जालन्यातील शेरसवारनगर झोपडपट्टी परिसरात राहणारे मोटारमेकानिक शेख युसूफ यांची दुस-या नंबरची कन्या सुध्दा डाॅक्टर बनणार असल्याची माहिती मिळाली तेव्हा कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले. रात्री चार वाजेच्या सुमारास ऑनलाईन यादी झळकली. सिएसएमएसएस महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे शेख सहेरिश युसुफ शेख यांचे दंत चिकित्सा(डेंटल) मध्ये शासकीय कोट्यातून नंबर लागला. कु.शिफा फिरदौस शेख युसुफ या मोठ्या बहीणीने गरीबीवर मात कर नीट परिक्षेत प्राविण्य मिळवत छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे एमबीबीएस डॉक्टरसाठी प्रवेश मिळवला. आता ती तिसऱ्या वर्षांत वैद्यकीय शिक्षण घेत आहे. मोठ्या बहीणीच्या पावलावर पाऊल टाकत लहान बहीनीने गरीबीवर मात करत नीट परिक्षेत 449 गुण घेतले. एमबीबीएस साठी थोडे गुण कमी पडल्याने तीने डेंटल मध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. एका गॅरेजवर मोटार मेकानिकचे काम करत शेख युसूफ यांनी हलाखिच्या परिस्थितीत मुलींना शिक्षण दिले. त्यांना मुलगा नाही चार मुली आहेत त्यांना मुलगा नसल्याचे खंत न बाळगता उच्च शिक्षणात आत्मविश्वास व शिक्षणात खडतर प्रवास करण्याचे शिकवले अशी प्रतिक्रिया प्रवेश मिळाल्यानंतर सहेरिशने दिली आहे. आई लेडीज टेलर असून त्यांनी कुटुंबाच्या संसारात हातभार लावला. अंकुश सरांनी दोन्ही मुलींना नीटमध्ये यश संपादन करण्यासाठी मार्गदर्शन केले. सहेरिशचे डेंटलला नंबर लागल्याने शिक्षक, नातेवाईकांनी अभिनंदन केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow