जालन्याचे मोटार मेकॅनिकची दुसरी मुलगीही बणणार एमबीबीएस डॉक्टर, गरज आहे आर्थिक पाठबळाची...!
 
                                जालन्याच्या मोटार मेकॅनिकची दुसरी मुलगीही होणार एमबीबीएस डॉक्टर, गरज आहे आर्थिक पाठबळाची...!
वडील मोटारसायकल मेकॅनिक तर आई आयेशा लेडीज टेलर काम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करुन मुलींना डॉक्टर बणवत आहे...या कुटुंबात मुलगा नाही चार मुली आहेत पण त्यांनी शिक्षणात विद्वत्ता सिध्द करून कुटुंबाला नावलौकिक मिळवून दिला म्हणून त्यांचे अभिनंदन...
जालना,दि.5(डि-24 न्यूज) मंगळवारी ऑनलाईन नीटचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये झोपडपट्टी परिसरातील शेरसवारनगर येथील मोटारसायकल मेकानिक शेख मोहम्मद युसुफ यांची कन्या शेख सहेरिश अक्साने तिसऱ्या प्रयत्नात गरीबीवर मात करत परिश्रम आणि जिद्द व चिकाटीच्या जोरावर नीट परीक्षेत 720 पैकी 523 गुण घेत यश संपादन केले आहे. तिचे अभिनंदन करण्यासाठी नातेवाईक गर्दी करत आहे. उर्दु हायस्कूलची हि विद्यार्थीनी आहे.
सन 2022 मध्ये शेख मोहम्मद युसुफ यांची जेष्ठ कन्या शिफा फिरदौस हिने 657 गुण मिळवत यश संपादन केले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे सध्या हि मुलगी एमबीबीएसचे दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. या मुलीचा खर्च गरीबीवर मात करत सोसत असताना दुसऱ्या मुलीनेही नीट मध्ये यश मिळवल्याने कुटुंब आर्थिक अडचणीत आले आहे. डि-24 न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितले शेख शहेरिशचे कमी गुण आल्याने कुटुंबाची चिंता वाढली आहे. प्रायव्हेट सिटमध्ये एमबीबीएसला प्रवेश घेतला तर लाखो रुपये कोठून आणणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. आर्थिक पाठबळ मिळाले तर दुसरी मुलगीही एमबीबीएस डॉक्टर होणार आहे याचा आनंद कुटुंबात आहे. एका खाजगी मेडीकल कॉलेजमध्ये एडमिशनची माहिती घेण्यासाठी पालक आले असताना त्यांनी हि माहिती दिली. यावेळी अंकुश सोनवणे सर यांनी मोफत दोन्ही मुलींना नीटच्या परीक्षेसाठी सहकार्य केले याबद्दल त्यांचे मोहम्मद युसुफ यांनी आभार मानले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            