जालान नगर जलवाहीनी फुटल्यामुळे मालमत्ताधारकांना नुकसानभरपाई

मनपाच्या वतीने जालान नगर येथील नागरिकांना नुकसान भरपाई...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज) -
जालान नगर रेल्वेस्टेशन येथील नागरिकांना महानगरपालिकेच्या वतीने आज नुकसान भरपाई देण्यात आली.
दिनांक 10 जून 2024 रोजी जालान नगर येथे महानगरपालिकेची 1400 मिमी व्यासाची एक्सप्रेस जलवाहिनी फुटली होती. यामुळे या परिसरातील लगतच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने नागरिकांचे मालमत्तेचे नुकसान झाले होते. या मालमत्ता धारकांनी महानगरपालकीकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती.
या अनुषंगाने सदर नुकसान भरपाई अदा करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मान्यतेनुसार कार्यप्रणाली निश्चित करण्यात येऊन एकूण 11 नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
आज मनपा मुख्यालय येथे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते विशाखा रॉय यांना नुकसान भरपाईचा धनादेश देण्यात आला. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे, लेखा अधिकारी संजय कोलते यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?






