जिल्हा श्री गणेश महासंघाच्या वतीने उद्या रक्तदान, प्रो-गोविंदा दहीहंडी स्पर्धा
जिल्हा श्री गणेश महासंघाच्या वतीने उद्या रक्तदान, प्रो-गोविंदा दहीहंडी स्पर्धा
छ. संभाजीनगर(औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) शतक महोत्सवी जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून यानिमित्ताने विविध समाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गणेश भक्तांचा सहभाग वाढवा या उद्देशाने आज शुक्रवारी (दि.13) रोजी सकाळी 10 वाजता समर्थ नगर येथील मध्यवर्ती कार्यालयात भव्य रक्तदान शिबीर तसेच जिल्हा परिषद मैदानावर प्रो गोविंदा दहीहंडी स्पर्धेचे दुपारी 3 वाजे दरम्यान भव्य आयोजन करण्यात आले आहे. या दोन्हीही उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष ऋषिकेश जैस्वाल, यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात शहरातील लोकप्रतिनिधीं, प्रशासकीय अधिकारी तसेच श्री गणेश महासंघाचे आजी माजी अध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, स्वागताध्यक्ष, महिला समिती, चिटणीस, सरचिटणीस, प्रमुख सल्लागार, युवा सचिव यांची उपस्थिती राहणार आहे. तरी या उपक्रमात श्री गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन शतक महोत्सवी श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार उत्सव समितीचे अध्यक्ष ऋषिकेश जैस्वाल, कार्याध्यक्ष अभिजित देशमुख, अनिल बोरसे, राजेंद्र दाते पाटील, संदीप शेळके, विशाल दाभाडे, अनिकेत पवार, हरीश शिंदे, चंद्रकांत इंगळे, निखिल चव्हाण, विनायक वेंन्नम, मयूर जाधव, राजू मन्सूरी, अक्षय लिंगायत, समीर देवकर, आदित्य शर्मा, विशाल काकडे, यांची उपस्थिती होती. प्रसिद्धी प्रमुख सचिन लीला सुखदेव अंभोरे, संजय राखूडें, सुमित दंडुके, अनिल सोनवणे यांनी केले आहे.
उद्या भव्य ढोल वादन स्पर्धा...
शतक महोत्सवी श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने उद्या शनिवार (दि. 14) रोजी संभाजी पेठेतील जिल्हा परिषद मैदानावर महाराष्ट्राची सण उत्सवाची परंपरा, संस्कृती जोपसणाऱ्या भव्य धुरंधर, अविस्मरणीय अशा ढोल वादन स्पर्धेचे सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या ढोल स्पर्धेतील विजेत्या ढोल पथकांना प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे 51 हजार, 31 हजार, 21 हजार पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संजय राखुंडे पाटील मो.9970593939, निखिल चव्हाण पाटील, मो.9403362007 या क्रमांकावर नाव नोंदणी करावी असे आवाहन संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार उत्सव समितीचे अध्यक्ष ऋषिकेश सरोज प्रदीप जैस्वाल जैस्वाल यांनी केले आहे.
What's Your Reaction?