जेष्ठ समाजसेवक सिद्दीक मोतीवाला यांचे दु:खद निधन, सोमवारी सकाळी दफनविधी...
जेष्ठ समाजसेवक सिद्दीक मोतीवाला यांचे दु:खद निधन..., सोमवारी सकाळी दफनविधी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज) - शहरातील प्रसिद्ध व्यवसायिक व जेष्ठ समाजसेवक मोहंमद सिद्दीक मोतीवाला यांचे एशियन हाॅस्पिटल येथे उपचारादरम्यान रविवारी पहाटे दु:खद निधन झाले असल्याची माहिती युसुफ मुकाती यांनी दिली आहे. त्यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान होते. त्यांचे वय 81 वर्षं होते. त्यांची नमाज-ए-जनाजा सोमवारी सकाळी हरी मस्जिद जुना मोंढा येथे अदा करण्यात येईल व दफनविधी कादर औलीया दर्गा कब्रस्तानात होईल. त्यांच्या पश्चात अश्फाक मोतीवाला, अतिक मोतीवाला व दोन मुली असा परिवार आहे.
What's Your Reaction?