जैस्वाल व तनवानी यांच्या मुलांना उमेदवारी देण्याचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न - पालकमंत्री संजय शिरसाट
जैस्वाल व तनवानी यांच्या मुलांना उमेदवारी देण्याचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न - पालकमंत्री संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) - आमदार प्रदीप जैस्वाल यांचे सुपुत्र ऋषिकेश जैस्वाल व माजी आमदार किशनचंद तनवानी यांचे सुपुत्र चंदु उर्फ बंटी तनवानी यांचे सुपुत्र गुलमंडी प्रभागातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. उमेदवारी वरुन दोघांच्या दोस्ती मध्ये वाद होऊ नये यासाठी शिंदे सेनेत समोर आव्हान आहे. आज पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले हा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे तो चर्चा करून सोडवून घेवू. जैस्वाल आणि तनवानी दोघेही मित्र आहेत त्यांचाही सुसंवाद आहे असे छोटे प्रश्न निवडणुकीत समोर येतच असतात यामध्ये वादाचा प्रश्न येत नाही. महापालिका निवडणुकीसाठी 20 ते 25 दिवसांचा वेळ मिळणार आहे. वेळ कमी आहे. निवडणुकीचे नियोजन करायचे आहे. इच्छूकांच्या मुलाखती घेण्याची तयारी सुरू आहे. महायुती साठी भाजपाच्या नेत्यांशी बोलणी सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर महायुतीचा निर्णय घेतला जाईल. हि निवडणूक कार्यकर्त्यांची आहे पक्षाच्या वतीने त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल.
आमदार जैस्वाल यांनी सांगितले मुलासाठी उमेदवारी मागितली आहे. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. तनवानी यांनीही तेच सांगितले हा आमचा परंपरागत वार्ड आहे. माझे भाऊ तेथून नगरसेवक होते. आता मुलासाठी उमेदवारी मागितली पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल वाद होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
What's Your Reaction?