टिव्ही सेंटर चौकात वृद्धाचा संशयास्पद मृत्यू, हत्या की अपघात पोलिस तपासात निष्पन्न होईल...!
टीव्ही सेंटर चौकात वृद्धाचा संशयास्पद मृत्यू...
डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव; हत्या की अपघात, पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार..
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7 (डि-24 न्यूज),- टीव्ही सेंटर चौक परिसरात सुमारे 70 ते 75 वर्षे वयाच्या एका वृद्धाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना सोमवारी समोर आली. वृद्ध व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे तसेच रक्तस्राव झाल्याचे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर वृद्धाची हत्या झाली आहे का, की अन्य कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला, हे पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिडको पोलीस ठाण्याच्या 112 क्रमांकाच्या मोबाईलवर तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना एका नागरिकाने फोन करून टीव्ही सेंटर चौक येथे एक वृद्ध व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिस घटनास्थळी पोहोचले असता वृद्ध व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळून आली. पाहणी केली असता त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव झाल्याचे दिसून आले. घटनास्थळी वृद्धाच्या काही वस्तूही पडलेल्या आढळून आल्या. पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका तसेच डॉक्टरांना पाचारण केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर वृद्धाला मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला.
घटनास्थळ सुरक्षित करून फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक 103/2026, कलम 194 BNSS अन्वये नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात अकबर ऊर्फ बंटी अजीम पठाण (वय 23, रा. बाबा मस्तान हॉल, रशीदपुरा, छत्रपती संभाजीनगर) याला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
वृद्धाच्या डोक्याला झालेली दुखापत, घटनास्थळी आढळलेल्या वस्तू आणि इतर परिस्थितींच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे. वृद्धाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, यासह हत्या झाली आहे का, याचा उलगडा तपास आणि वैद्यकीय अहवालानंतर होणा
र आहे.
What's Your Reaction?