टीव्ही सेंटर ते हर्सुल टी पाॅईंट रस्त्यावरील 10 अतिक्रमण धारकांविरुध्द कार्यवाही

टीव्ही सेंटर ते हर्सूल टी पॉईंट रस्त्यावरील 10 अतिक्रमण धारकांविरुद्ध कारवाई
औरंगाबाद, दि.7(डि-24 न्यूज) महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागामार्फत आज टीव्ही सेंटर जयस्वाल हॉल ते हर्सूल टी या परिसरात रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली.
या मोहीमे अंतर्गत वाहतुकीला अडथळा करणाऱ्या एकूण दहा अतिक्रमण धारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
जैस्वाल हॉल येथून लहान हातगाड्या जप्त करण्यात आल्या. शरद हॉटेल जवळ एक पाणीपुरी आणि भेलपुरीची गाडी जमा करून रस्त्यावर किरकोळ स्वरूपाचे फळ विक्रेत्याविरुद्ध कारवाई करण्यात आली व आज गोकुळाष्टमीनिमित्त होणारा वाहतुकीला रस्ता मोकळा करण्यात आला. पुढे व्हीआयपी रस्त्यावर हर्सूल टी पॉइंट येथे दोन टपरीधारका विरुद्ध कारवाई करण्यात आली. एक लोखंडी आठ बाय बारा फूट उंचीची टपरी हर्सूल कारागृहा समोरील विद्युत विभागाच्या कार्यालया भिंतीलगत लावण्यात आली होती सदर टपरी हटवण्यात आली. त्यानंतर जटवाडा चौक व हर्सूल कारागृह प्रवेशद्वारा लगत असलेले खाद्यपदार्थ नाष्टा विक्री सेंटर विरुद्ध कारवाई करण्यात येऊन त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले.
यापुढे हडको कॉर्नर डी मार्ट येथील वाहतुकीला अडथळा करणारे आणि रस्त्यावरील व्हीआयपी रोडवर असलेले अतिक्रमण काढून काही किरकोळ स्वरूपाचे साहित्य जप्त करण्यात आले. दहीहंडी च्या कार्यक्रमाला येणारा नागरिकांना वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही यासाठी रस्ता मोकळा करून देण्यात आला. अतिक्रमण हटाव विभाग मार्फत शहरात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकी निमित्त मा.प्रशासकांनी पाहणी केलेल्या सर्वच व्हीआयपी रस्त्यावर व इतर ठिकाणच्या रस्त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत मा. प्रशासक यांनी सर्व रस्त्यावर विक्री करणाऱ्यांना आवाहन केले आहे की आपले रस्त्यावरची अतिक्रमणे आपण स्वतः काढून घ्या. याबाबत प्रशासक जी श्रीकांत स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी करत आहेत. शहरात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी पूर्ण रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात येत आहे .सदर कारवाई प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विभाग प्रमुख सविता सोनवणे , पदनिर्देशित अधिकारी प्रभाग क्रमांक चार अशोक गिरी यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मध्ये इमारत निरीक्षक सय्यद जमशेद पथकातील सर्व कर्मचाऱ्यांनी कारवाई सहभाग घेतला.
What's Your Reaction?






