डाॅ. कादरी मानसिक आरोग्य केंद्रात जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा...

डाॅ. कादरी मानसिक आरोग्य केंद्रात जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज) आज जगभरात जागतिक तंबाखू विरोधी दिन-2025 देशभरात साजरा करण्यात आला. या निमित्ताने पडेगांव येथील डाॅ.अजिज अहमद कादरी यांच्या मेंटल हेल्थ सेंटर येथे मानसिक आरोग्याला पाठींबा देण्यासाठी आणि तंबाखुमुक्त समाज निर्माण करण्यासाठी एक प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम दरम्यान भाषण स्पर्धा, रील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत उत्तीर्ण स्पर्धकांना विशेष अतिथी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, अपर पोलिस अधिक्षक श्रीमती अन्नपुर्णा सिंह यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
यावेळी प्रमुख अतिथी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले तरुन युवक हे अंमली पदार्थ, गुटखा, तंबाखू इतर मादक पदार्थ ड्रग्स यांसारख्या विषारी घटक असलेले पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण जास्त आहे यामुळे कर्करोग यांसारख्या दुर्धर स्वरुपाचा गंभीर आजार होण्याचे प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या गंभीर आजारामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. मानवी जीवन हे अनमोल आहे करिता तरुण युवक व युवतींनी अंमली पदार्थ, गुटखा, तंबाखू इतर ड्रग्स सारखे विषारी अंमली पदार्थांच्या सेवनापासून दुर राहावे व इतरांनाही या प्रकारच्या वाईट व्यसनापासून दूर राहण्यास परावृत्त करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी डाॅ.अजिज अहेमद कादरी व डाॅ.मेराज कादरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
What's Your Reaction?






