डि-24 न्यूजच्या बातमीवर शिक्कामोर्तब, अखेर महाराष्ट्रात S I R करण्यासाठी 8 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ, मतदारांना दिलासा

 0
डि-24 न्यूजच्या बातमीवर शिक्कामोर्तब, अखेर महाराष्ट्रात S I R करण्यासाठी 8 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ, मतदारांना दिलासा

डि-24 न्यूजची बातमी खरी ठरली, महाराष्ट्रात 8 ऑगस्ट पर्यंत S I R करण्यासाठी मुदतवाढ 

मतदारांसाठी दिलासा! 

राज्यातील निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेला दहा दिवसांची मुदतवाढ...

मुंबई, दि.18(डि-24 न्यूज)- मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण अभियानाला महाराष्ट्रात दहा दिवसांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने SIR प्रक्रियेचे वेळापत्रक सुधारित केले असून, मतदारांना नोंदणी, दुरुस्ती आणि हरकती नोंदवण्यासाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध करून देण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार SIR अंतर्गत मतदारांच्या घराघरात जाऊन पडताळणी केली जात आहे. या प्रक्रियेद्वारे मतदार यादीतील दुबार नावे, स्थलांतरित मतदार, मृत व्यक्तींची नावे यांची तपासणी करून पात्र मतदारांची नोंद कायम ठेवण्याचा उद्देश आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या या अभियानासाठी मोठ्या प्रमाणावर बूथ लेव्हल ऑफिसर्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांना मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा इतर तपशीलांमध्ये बदल करायचा असल्यास या कालावधीत अर्ज करता येणार आहे.

SIR अभियानाचे सुधारित वेळापत्रक :

BLO मार्फत घराघरात भेटी : 30 जून ते 8 ऑगस्ट 2026 मतदार केंद्रांचे पुनर्रचना/व्यवस्थापन : 8 ऑगस्ट 2026 प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध : 17 ऑगस्ट 2026 दावे आणि हरकती दाखल करण्याचा कालावधी : 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2026 अंतिम मतदार यादी प्रसिद्ध : 19 ऑक्टोबर 2026

या मुदतवाढीमुळे मतदारांना आवश्यक कागदपत्रांसह आपली माहिती तपासण्याची आणि त्रुटी दुरुस्त करण्याची संधी मिळणार आहे. निवडणूक आयोगाने सर्व संबंधित अधिकारी आणि राजकीय पक्षांना सुधारित वेळापत्रकाची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, नागरिकांनी SIR प्रक्रियेत सहभागी होऊन आपले नाव मतदार यादीत कायम असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र निवडणूक आयुक्तांनी 17 जुलै रोजी मुदतवाढ झाल्याचे आदेश काढले आहेत. प्रसिध्दीसाठी पत्र देण्यात आले आहे. म्हणून डि-24 न्यूजने 16 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेली बातमी खरी ठरली आहे. वाचकांचा विश्वास आमच्या बातमीवर आहे हे अधोरेखित झाले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow