डि-24 न्यूजला डिजिटल मीडीया परिषदेच्या अधिवेशनात केले सन्मानित...!

डि-24 न्यूजला डिजिटल मीडीया परिषदेच्या अधिवेशनात केले सन्मानित...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज) - अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडीया परिषद पहिले राज्यस्तरीय अधिवेशन आज 14 सप्टेंबर रोजी संत एकनाथ रंगमंदीर येथे आयोजित करण्यात आले होते. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून मागिल पाच वर्षांपासून ताज्या बातम्या मराठी वेबपोर्टल डि-24 न्यूजने वाचकांच्या मनात सोशल मीडियावर वेगळा ठसा उमटवला आहे. डिजिटल पत्रकारीतेमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन जेष्ठ पत्रकार आरेफ देशमुख यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, राज्यसभेचे खासदार डॉ.भागवत कराड, अखिल भारतीय मराठी परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, जेष्ठ संपादक तुळशीराम भोईटे, अभिव्यक्ती न्यूज चॅनलचे रवींद्र पोखरकर, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष अनिल वाघमारे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, कार्याध्यक्ष सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूर भाई शेख, गणेश मोकाशी, गो.पी.लांडगे, हेमंत वणजू, प्रकाश कांबळे, जिल्हाध्यक्ष बालाजी सुर्यवंशी, मुंबई प्रतिनिधी सुनील वाघमारे, सचिव प्रकाश भगनुरे, उपाध्यक्ष महादेव जामनिक, उपाध्यक्ष ब्रम्हानंद चक्करवार, कार्याध्यक्ष कानिफ अन्नपुर्णे यांची उपस्थिती होती. सन्मान मिळाल्याबद्दल मिळाल्याबद्दल पत्रकारीता क्षेत्रात अभिनंदन केले जात आहे.
What's Your Reaction?






