डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अभिवादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षातर्फे अभिवादन; सामाजिक समतेच्या विचारांचा जागर....
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज) - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे भडकल गेट येथे खा.डॉ. कल्याण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर व शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यात आली व बाबासाहेबांनी दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा जागर करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत समाजातील अन्याय, अस्पृश्यता आणि भेदभावाविरुद्ध संघर्ष उभारला. शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवून आणण्याचा त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा विचार समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरणा देणारा ठरला आहे. भारतीय संविधानाच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बजावलेली भूमिका देशासाठी ऐतिहासिक ठरली. त्यांनी तयार केलेल्या संविधानामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, न्याय आणि स्वातंत्र्याची हमी मिळाली. त्यामुळेच बाबासाहेबांचे कार्य आणि विचार आजही संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक ठरत आहेत.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियान जिल्हा प्रभारी मा.आ. विवेक बन्सल, खा.डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ, जगन्नाथ काळे, प्रदेश सचिव अशोक डोळस, सिडको ब्लॉक अध्यक्ष भाऊसाहेब जगताप, संघटन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल, आतिश पितळे, अब्दुल रईस शेख, प्रकाश सानप, शेख कैसर बाबा, पप्पूराज ठूबे, सलीम पटेल, शेख फैयाजुद्दीन, मुकेश सोनवणे, शफीक शहा, बाबासाहेब पवार, योगेश थोरात, उत्तम दणके, इंजि.इफ्तेखार शेख, साहेबराव बनकर, अनिल नलावडे, जयपाल दवणे, चंद्रप्रभा खंदारे, इंदू खरात, बरखा विंचुरे, सुनीता मगरे, भाऊसाहेब नवगिरे, विश्वंभर भालेराव, बाबासाहेब बोरचटे, गोरख शिंदे, सुधाकर भोळे, श्रीकांत रनभरे आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?