तिरुपती पार्क सिडकोतील 38 अनाधिकृत नळ खंडित
 
                                तिरुपती पार्क सिडकोतील 38 अनाधिकृत नळ खंडित
औरंगाबाद, दि.15(डि-24 न्यूज) सिडको एन-4 येथील तिरुपती पार्क मधील 38 अनाधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत.
आज आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार विशेष अनधिकृत नळ जोडणी शोध पथकचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त-2 तथा मुख्य लेखा अधिकारी संतोष वाहुळे यांच्या अधिपत्त्याखाली तिरुपती पार्क, एन-4 सिडको या भागात महानगरपालिकेच्या जुन्या 150 मिमी जलवाहिनी वरील एकूण 38 अनधिकृत नळ खंडित करण्यात आले.
सदरील ठिकाणी नवीन HDPE जलवाहिनी टाकण्यात येत असल्याने येथील जुन्या जलवाहिनी वरील सर्व अनधिकृत नळ खंडित करण्यात आले,
ज्या नागरिकांचे नळ सध्या अनधिकृत आहेत असे नळ त्यांना नवीन HDPE जलवाहिनी वर अधिकृतपणे कंपनी द्वारे रीतसर नळ जोडण्या करून देण्यात आल्या असून उर्वरित खंडित करण्यात आले आहेत.
शहरात अनेक ठिकाणी अश्या नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम चालू असल्याने पथक निरीक्षण करून अनधिकृत नळ खंडित करण्याची मोहीम देखील चालू आहेत.
असे पथक अभियंता रोहित इंगळे यांनी सांगितले.
सदरील कारवाही उप अभियंता महेश चौधरी,पथक अभियंता
रोहीत इंगळे, कनिष्ठ अभियंता कल्याण सातपुते आणि
पथक कर्मचारी मो. शरीफ, वैभव भटकर, स्वप्निल पाईकडे, तमिज पठाण, सागर डिघोळे, तुषार पोटपिल्लेवार आदींनी पूर्ण
 
केली.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            