तीन तासांत पाठलाग करुन गंगापूर पोलिसांनी पकडले तीन कटकट गेट येथील चोरटे
तीन तासांत पाठलाग करुन गंगापूर पोलिसांनी पकडले कटकट गेट येथील चोरटे
औरंगाबाद, दि.15(डि-24 न्यूज) गंगापुर पोलीसांनी पाठलाग करून 03 तासाच जबरीचोरी करून फरार झालेले तीन सराईत चोरटयांना मुद्देमालासह शिताफिने केले जेरबंद ú…
दिनांक 15/11/2023 रोजी मध्यरात्री 01:00 वाजेच्या सुमारास पोलीस ठाणे गंगापुर हद्यीतील छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर महामार्गावरिल भेंडाळा फाटाच्या पुढे नादी पेट्रोल पंपाच्या जवळ असलेल्या महाराष्ट्र ढाबा येथे तीन अज्ञात व्यक्तीने हॉटेल मध्ये घुसून हॉटेलच्या कॅश काउंटर जवळ झोपलेले हॉटेल मालक फेरोज सांडू शेख वय 27 वर्षे रा. ढोरेगाव यांना लोखंडी सळईने मारहाण करून चाकुचा धाक दाखवून जबरदस्तीने त्यांचे हॉटेलच्या गल्यातील 9700 रूपये रोख हिसकावुन घेवुन त्यांनी शाईन मोटरसायकल क्रमांक एम.एच. 20 डी.पी. 5641 ही वर बसुन पळुन गेले बाबत माहिती गंगापूर पोलीसांना मिळाली.
यावरुन श्री. सत्यजीत ताईतवाले, पोलीस निरीक्षक गंगापूर यांनी त्यांचे पथकासह तात्काळ घटनास्थळी जावुन पाहणी करून जबरीचोरी करणारे चोरटयाचे गाडीचे व त्यांचे वर्णन फिर्यादी फेरोज शेख यांचे कडुन घेतले. तसेच अंधाराचा फायदा घेत तीन्ही चोरटे हे औरंगाबादच्या दिशेने सुसाट वेगात गेले असल्याची माहिती त्यांना मिळाली.
मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस ठाणे गंगापूरला लागुन असलेल्या सर्व रोडवर नाकाबंदी सर्तक करण्यात येवुन संशयीत वाहन व व्यक्ती बाबत शोध सुरू करण्यात आला होता. यावेळी पो.नि. ताईतवाले व त्यांचे पथक संशयीताचे मागावर असतांना त्यांना अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगरकडे कडे जाणारे महामार्गावरिल ईसारवाडी फाटयाचे अलिकडे ढोरेगाव नजिक बंद असलेल्या ईसार कंपनीच्या पेट्रोलपंप जवळ काही संशयीत हालचाल निदर्शनास आली.
यावरुन पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले व त्यांचे पथकांने तात्काळ पेट्रोलपंपाच्या दिशने धाव घेवुन पोलीसांनी त्यांचे वाहन अलिकडेच उभे केले, बराच अंधार झालेला असल्याने बंद असलेल्या ईसार पंपाच्या परिसरात लपत छपत गेले असता, तेथे काहि अंतरावर संशयीत मोटरसायकल दिसुन आली. तसेच संशयीत व्यक्तीं या परिसरात लपून बसले आहेत याबाबत हालचाल पोलीसांचे लक्षात आल्याने त्यांनी बंद असलेल्या ईसार पेट्रोल पंपाच्या परिसराला घेराव घालुन सापळा आखला, पोलीसांचे पथक पुढे पुढे जात असतांना लपलेल्या व्यक्तींना पोलीसांची चाहुल लागताच त्यांनी अंधारात शेतातील रस्त्याने सुसाट पळ काढला. यावेळी पोलीसांनी सुध्दा त्यांचा अंधारात कसोशिने पाठलाग सुरू केला, अंधाराचा फायदा घेवुन पळुन जाण्याच्या प्रयत्नात असतांना पोलीसांनी या तिनही व्यक्तींनच्या अत्यंत शिताफिने सकाळी 4:30 वाजेच्या सुमारास म्हणजे अवघा 3 तासात मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केले.
यावेळी त्यांनी त्यांचे नावे पुढील प्रमाणे सांगितली आहेत. जुबेर नासेर शेख, वय 29 वर्ष, शेख ईरफान शेख सरवर वय 27 वर्ष, रिझवान पाशेखान वय 28 वर्ष सर्व रा. नेहरूनगर, कटकटगेट, हत्तीसिंगपुरा, औरंगाबाद त्यांना विश्वासात विचारपुस करता त्यांनी हॉटेल मालक यांना मारहाण करून जबरीने हॉटेलच्या गल्यातील 9700 रूपये रोख चोरुन पसार झाल्याचे कबुल केले.
त्यांचे ताब्यातुन हॉटेल मालकाकडुन जबरदस्तीने चोरून नेलेले 9700 रूपये रोख, तीन मोबाईल, शाईन मोटरसायक,चाकु, असा एकुण 63,700/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांचे विरुध्द पोलीस ठाणे गंगापूर येथे भादंवी कलम 394, 34 भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन नमुद गुन्हयात त्यांना अटक करण्यात आली आहे.
नमुद आरोपी हे सराईत असुन त्याचेवरती औरंगाबाद शहर येथे सुध्दा गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास गंगापुर पोलीस करित आहेत.
नमुद कारवाई ही मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, महक स्वामी ,उपविभागीय पोलीस अधिकारी ,गंगापुर यांचे मार्गदर्शनाखाली,
श्री सत्यजीत ताईतवाले, पोेलीस निरीक्षक, पो.उप.नि. अजहर शेख, पोलीस अंमलदार दिनकर थोरे, गंगावणे,अभिजीत डहाळे, अमोल कांबळे,तेनसिंग राठोड यांनी केली आहे.
What's Your Reaction?