तेली समाज वधूवर पालक मेळाव्यात जुळले 37 जोडप्यांचे लग्न...!

तेली समाज वधूवर पालक मेळाव्यात जुळले 37 जोडप्यांचे लग्न...
राज्यस्तरीय मोफत वधूवर पालक परिचय मेळाव्यास प्रतिसाद...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.10 (डि-24 न्यूज) - तिळवण तेली समाजाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मोफत वधूवर पालक परिचय मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. या सोहळ्यात 943 वधूवरांनी सहभाग नोंदवून आपला परिचय करून दिला. यावेळी 37 जोडप्यांचे लग्न जुळले असून, राज्यभरातील समाजबांधवांनी उपस्थिती लावली.
चिकलठाणा येथील मातोश्री लॉन्स येथे स्व. दैविदास बाबुराव साबने नगरीत रविवार, 9 रोजी सकाळी 11 वाजता वधूवर परिचय मेळाव्याचे उद्घाटन तैलीक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षिरसागर यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचे पुजन करण्यात आले. यावेळी खासदार संदीपान भुमरे, शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतुल चव्हाण, माजी जिप अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, अनिल मकरिये व तेली समाजचे सर्व तालुकाध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती. या परिचय मेळाव्यात अंध, अंपग विधवा, घटस्फोटीत व वेळवर आलेल्या मुला -मुलीचा परिचय करून घेतला. मेळाव्याला महाराष्ट्रातुन जवळपास 4 हजार समाज बांधव उपस्थित होते. मनोज संतान्से, विष्णूशेठ सिदलंबे, सुरेश मिटकर, नारायण दळवे, कपिल राऊत, भगवान मिटकर, गणेश वाघलव्हाळे, भिकन राऊत, ज्ञानेश्वर लुटे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हाध्यक्ष सुरेश कर्डीले, प्रास्ताविक कचरु वेळंजकर यांनी केले
.
What's Your Reaction?






