दुसऱ्या टप्प्यात 89 मतदारसंघात 64.70 मतदान, महाराष्ट्रात 53.71 टक्के मतदान

 0
दुसऱ्या टप्प्यात 89 मतदारसंघात 64.70 मतदान, महाराष्ट्रात 53.71 टक्के मतदान

देशातील ८९ मतदारसंघात ६४.७० टक्के मतदान; महाराष्ट्रात ५३.७१ टक्के मतदान

मुंबई,दि.26(डि-24 न्यूज) देशभरातील ८९ मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. या सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची वेळ संपेपर्यंत अर्थात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी ६४.७० इतके टक्के मतदान झाले. तर यांपैकी महाराष्ट्रात आठ मतदारसंघात ५३.७१ इतके टक्के मतदान झालं. यामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक ५६.६६ टक्के मतदानाची नोंद झाली. निवडणूक आयागानं ही आकडेवारी जाहीर केली आहे.

देशातील १३ राज्यांमध्ये एकूण ८९ मतदारसंघांत दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी २६ एप्रिल रोजी पार पडले. यासाठी १६ कोटी मतदार पात्र होते, पण त्यांपैकी सुमारे ९ कोटी मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ९ मतदारसंघ हे अनुसुचित जातीसाठी तर ७ मतदारसंघ अनुसुचित जमातीसाठी राखीव होते.

यामध्ये केरळमधील सर्व २० मतदारसंघातील मतदान पूर्ण झालं आहे. तर महाराष्ट्रातील १३ मतदारसंघातील मतदान संपलं. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात आसाममधील ५, बिहारमधील ५, छत्तीसगडमधील ३, कर्नाटकातील १४, मध्यप्रदेशातील ७, महाराष्ट्रात ८, मणिपूरमध्ये १, राजस्थानात १३, त्रिपुरात १, उत्तर प्रदेशात ८, पश्चिम बंगालमध्ये ३ आणि जम्मू व काश्मीर या राज्यात १ मतदारसंघात शुक्रवारी मतदान पार पडले.

दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी झालेल्या मतदानामुळं प्रकाश आंबेडकर (अकोला), नवनीत राणा (अमरावती), रविकांत तुपकर (बुलडाणा), रामदास तडस (वर्धा) यांच्यासह देशभरात ओम बिर्ला, राहुल गांधी, हेमा मालिनी, अरुण गोविल, एच. डी. कुमारस्वामी, शशी थरूर, भूपेश बघेल, के. सी. वेणुगोपाल, दानिश अली या महत्वाच्या उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे.

महाराष्ट्रातील आठ मतदारसंघातील मतदान

वर्धा – ५६.६६ टक्के

वाशिम-यवतमाळ – ५४.०४ टक्के

अमरावती – ५४.५० टक्के

अकोला – ५२.४९ टक्के

बुलडाणा – ५२.८८ टक्के

हिंगोली – ५२.०२ टक्के

परभणी – ५३.७९ टक्के

नांदेड – ५३.५३ टक्के

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow