धर्मेंद्र प्रधान यांच्या नंतर मोदींचा नंबर - इम्तियाज जलिल
प्रधान यांच्यानंतर मोदींचा नंबर - इम्तियाज जलिल
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज)- देशात नीट पेपर लिक व विविध स्पर्धा परीक्षांचे पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. देशात महागाई व बेरोजगारी वाढत आहे. याकडे गेली 12 वर्षांपासून सरकारने गंभीरपणे दखल घेतली नाही. सरकारला वाटले आपले कोणी काही करू शकत नाही आपल्याकडे बहुमत आहे. पण विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनामा मंजूर करून घेत हे दाखवून दिले. आम्ही देश हितासाठी काही करु शकतो. सरकारला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. नीट पेपर लिक प्रकरणी जे दोषी तुरुंगात आहेत त्यांच्या सोबत धर्मेंद्र प्रधान यांनीही जायला हवे होते. तरच विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असता. देशात न्याय मिळणे भाजपा सरकारच्या कार्यकाळात कठीण झाले आहे. वर्षानुवर्षे विद्यार्थी नीट परीक्षा व विविध स्पर्धा परीक्षा देण्यासाठी परिश्रम घेतात पेपर लिक मुळे त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होतो. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता पंतप्रधान मोदींचा नंबर आहे त्यांच्या पतनाची आता वेळ आली आहे अशी टिका प्रतिक्रिया देताना एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केली आहे.
What's Your Reaction?