धीरज परदेशी हत्या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी घेण्याची काँग्रेसची मागणी
धीरज परदेशी हत्या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करण्याची काँग्रेसची मागणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) -भाजप आमदार अक्षय कर्डिले यांच्या कथित भडकाऊ वक्तव्याची निष्पक्ष चौकशी करून कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याबाबत. तसेच अहिल्यानगर येथील धीरज परदेशी हत्या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने पोलिस आयुक्तांना निवेदन सादर करुन करण्यात आली आहे.
अलीकडे आंदोलनादरम्यान भाजप आमदार अक्षय कर्डिले यांनी केलेल्या कथित वक्तव्याबाबत समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीने किंवा कोणत्याही व्यक्तीने संविधानाचा अवमान करणारी, समाजामध्ये जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करणारी अथवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचवू शकणारी वक्तव्ये करू नयेत.
त्यामुळे सदर वक्तव्याची निष्पक्ष चौकशी करून, त्यामध्ये कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध लागू असलेल्या कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.
तसेच अहिल्यानगर येथील रहिवासी धीरज परदेशी यांच्या हत्या प्रकरणाचा आम्ही तीव्र निषेध करतो. या प्रकरणातील सर्व आरोपींची निष्पक्ष चौकशी करून पुरावे व कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. सदर प्रकरणाची सुनावणी शक्य तितक्या जलदगतीने करण्यासाठी शासन व न्यायव्यवस्थेकडे आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात यावी. दोष न्यायालयात सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी.
आमच्या प्रमुख मागण्या :
आमदार अक्षय कर्डिले यांच्या कथित भडकाऊ वक्तव्याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
चौकशीत गुन्हा निष्पन्न झाल्यास संबंधितांविरुद्ध लागू कायद्यांनुसार तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा.
कोणत्याही व्यक्तीला जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करून सामाजिक शांतता भंग करण्याची मुभा देऊ नये.
धीरज परदेशी हत्या प्रकरणाचा तपास निष्पक्ष व जलदगतीने पूर्ण करण्यात यावा.
या प्रकरणातील दोषींना न्यायालयीन प्रक्रियेतून कठोरात कठोर शिक्षा मिळण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.
समाजामध्ये शांतता, बंधुभाव आणि कायदा-सुव्यवस्था कायम राहण्यासाठी भडकाऊ वक्तव्ये करणाऱ्यांवर कायद्यानुसार समान कारवाई करण्यात यावी.
काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने धीरज परदेशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत असून त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, ही आमची ठाम मागणी आहे.
सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी अशा संवेदनशील घटनांमध्ये मौन न बाळगता पुढे येऊन सामाजिक शांतता, संविधानिक मूल्ये आणि कायद्याचे राज्य यांचे समर्थन करावे, ही विनंती.
आम्हाला समाजात शांतता, बंधुभाव आणि न्याय हवा आहे नफरत आणि जातीय तेढ नको. असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शेख युसुफ, मराठवाडा काँग्रेसचे नेते अहमद चाऊस, अल्पसंख्यांक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार, इंटक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शेख अथर, डॉ अरूण शिरसाट, अँड सुभाष देवकर, मुजफ्फर खान, शेख शफीक सरकार, सय्यद नदीम सौदागर, जखिया बाजी शेख, सबिया बाजी शेख, अस्मत खान, सलीम शाहानुर पटेल, शिरीष चव्हाण, महेश वैद्य, सय्यद सय्यद, शहाजेब ऐतेशाम खान, शफीक शाहा, सय्यद युनूस, शेख एजाज, सय्यद उमेर, अजमल सिद्दिकी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन अल्पसंख्याक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिस पटेल आणि शहर जिल्हा अल्पसंख्याक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मोईन इनामदार यांनी केले होते.
What's Your Reaction?