नदी, नाल्यावरील अतिक्रमण स्वतः काढून घ्या अन्यथा मनपा कारवाई करणार...!
नदी,नाल्यावरील अतिक्रमण स्वतः काढून घ्या अन्यथा कारवाईचा इशारा...
औरंगाबाद,दि.21(डि-24 न्यूज ) महानगरपालिकेच्या वतीने पावसाळी मोसमा मध्ये संभाव्य अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार विविध उपाय योजना करण्यात येत आहेत.
आता पर्यंत पावसाळ्याआधी अंदाजित 84 किलोमिटर अंतरातील नाल्यातील गाळ काढण्यात आला आहे. आतापर्यंत 75%काम पूर्ण झाले असून उर्वरित काम मे अखेर पर्यंत पूर्ण होणार आहे.
महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, चालू पावसाळी मोसमामध्ये संभाव्य अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नदी, नाल्याकाठचे अतिक्रमीत घरांमध्ये नदी/ नाला प्रवाहाचे पाणी शिरून जीवीत व वित्त हानी होण्याची शक्यता असते. अशा नागरिकांनी अतिक्रमीत बांधकामे स्वतःहून काढून घ्यावेत तसेच जीर्ण झालेल्या / मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती / घरे अथवा त्यांचा काही भाग कोसळून जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी सदरील इमारतीची दुरूस्ती बाबत योग्य ती कार्यवाही करावी किंवा धोकादायक भाग पाडून टाकावा / उतरून घ्यावा. अन्यथा महानगरपालिकेमार्फत पाडण्यात येईल. त्यासाठी आलेला खर्च बांधकामाच्या मालक किंवा भोगवटा धारकाकडून वसूल केला जाईल. पावसाळयात धोकादायक इमारतीच्या दुरूस्ती अभावी काही दुर्घटना होऊन जीवित वा वित्त हानी झाल्यास त्यास संबंधीत घरमालक / भोगवटाधारक जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी.
तसेच नागरिकांनी आपल्या आसपासच्या परिसरात अशा प्रकारे जीर्ण झालेल्या / मोडकळीस आलेल्या काही धोकादायक इमारती/घरे तसेच नदी/नाला काठावरील प्रवाहाचे पाणी जाऊ शकते असे घरे/ इमारती असल्याचे निदर्शनास आल्यास महानगरपालिका मुख्यालयात उपायुक्त-1 दालन येथे लेखी स्वरूपात दाखल करावे.असे अतिरिक्त आयुक्त-2 संतोष वाहुळे यांनी कळविले आहे.
What's Your Reaction?