नामांतरावर सुनावणी, न्यायालयाने सरकारी पक्षाचे ऐकले, उद्याही सुनावणी
नामांतरावर सुनावणी, न्यायालयाने सरकारी पक्षाचे ऐकले, उद्याही सुनावणी
उस्मानाबाद, औरंगाबादचे याचिकाकर्ते उपस्थित, लेखी स्वरूपात जवाब पण सादर करण्याचे परवानगी l
मुंबई, दि.13(प्रतिनिधी)
आज बाम्बे हायकोर्टात औरंगाबाद व उस्मानाबाद नामांतरावर न्यायालयाने सरकारी पक्षाचे म्हणणे ऐकले. सरकारी वकील सराफ यांनी दोन्ही शहराच्या नामांतरावरावर आपले मत मांडले. नामांतर विरोधात याचिकाकर्ते यांना लेखी स्वरूपात जवाब सादर करण्याचे परवानगी पण न्यायालयाने यावेळी दिले. उद्याही सकाळी या प्रकरणात पुढे सुनावणी होणार आहे. औरंगाबाद नामांतरावर याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांच्या वकीलांनी जो युक्तिवाद केला व त्यांच्या याचिकेत असलेल्या जे मुद्दे आहे त्याबद्दल लेखी स्वरूपात पण अपला जवाब सादर करणार असल्याचे उस्मानी यांनी सांगितले. उस्मानाबाद नामांतर विरोधी याचिकाकर्ते यांच्या वतीने हज़ारो पानांचे कागदपत्रे सादर केले. आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा मोहंमद हिशाम उस्मानी यांनी यावेळी व्यक्त केली तर ते न्यायाच्या अपेक्षेने न्यायालयात ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्या सोबत जेष्ठ वकील अॅड एस.एस.काझी व त्यांचे कनिष्ठ अॅड मोइनुद्दीन शेख उपस्थित होते.
What's Your Reaction?