निवडणुकीपूर्वी वंचितला धक्का, शहराध्यक्षाने दिला राजीनामा
 
                                निवडणुकीपूर्वी वंचितला धक्का, शहराध्यक्षाने दिला राजीनामा
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीला धक्का बसला आहे. औरंगाबाद मध्यचे शहराध्यक्ष अहमद जलिस यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्याकडे आज पाठवला आहे. त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे मध्य शहराध्यक्ष पद व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. माझ्या मेहनतीचे व योगदानाचा पक्षाने विचार केला नाही असे माझे ठाम मत आहे त्यामुळे पक्षाच्या कार्यपद्धतीवर विश्वास राहिलेला नाही.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            