निवडणूकीत पैशांचा वापर निदर्शनास आल्यास थेट आयकर विभागाला कळवा...!
विधानसभा निवडणूकीत पैशांचा वापर
निदर्शनास आल्यास थेट आयकर विभागाला कळवा
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज):- विधानसभा निवडणूक २०२४ च्या दरम्यान काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी आयकर विभागाने थेट जनतेला आवाहन केले आहे. अशाप्रकारे रोख रकमेचा वापर, वाटप रकमेची वाहतुक अशा बाबतीत नागरिकांनी आयकर विभागाला द्यावी, माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवण्यात येईलअसेही कळविण्यात आले आहे.याबाबत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व ९ विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी काळ्या पैशाच्या वापराची माहिती गोपनियरित्या द्यावी. त्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००-२३३-०३५५, १८००-२३३-०३५६ वर माहिती द्यावी तसेच ९४०३३९०९८० या व्हॉट्सॲप क्रमांकावर उपलब्ध असलेली छायाचित्रे, व्हिडीओ पाठवावीत. तसेच nagpur.addidit.inv@incometax.gov.in व nashik.addidit.inv@incometax.gov.in या इमेलवरही माहिती देऊ शकता. माहिती देणाऱ्या व्यक्तिचे नाव गुप्त ठेवले जाईल,असे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक मंगेश केदार यांनी केले आहे.
What's Your Reaction?