पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला निवडून देतील - खा.सुप्रीया सुळे
मतदार आमच्या उमेदवाराला निवडून देतील - खा.सुप्रीया सुळे
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज)- औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडी पुरस्डॉकृत उमेदवार प्रतापसिंग वेदप्रकाश पाटील यांना पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मतदार निवडून देतील अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
आज छत्रपती संभाजीनगर येथे त्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौ-यावर होत्या. पदाधिकारी यांच्या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत हि माहिती दिली. यावेळी पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ.प्रतापसिंग पाटील, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहर जिल्हाध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, मुश्ताक अहमद, काँग्रेसचे शहराध्यक्ष एड सय्यद अक्रम, नगरसेवक नवीन ओबेरॉय व पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली. दुष्काळाने शेतकरी त्रस्त असताना पाच हजार रुपये मदतीने दिवाळी साजरी होईल का...? नमो किसान योजनेचे दोन हप्ते चार हजार रुपये अजून मिळालेले नाही. असे एकूण 9 हजार रुपये आणि हेक्टरी एक लाखांची मदत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. महाविकास आघाडीत एकजूट आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवत आहोत. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत उबाठाचा पाठिंबा मिळेल आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत मैत्रिपूर्ण लढत महायुतीत पण होत आहे. हि निवडणूक लोकसभा, विधानसभा सारखी नाही. मतदार सुजाण आहे ते योग्य उमेदवार निवडून देतील. आम्ही सक्षम उमेदवार दिला आहे त्यांना पसंती मिळत आहे. काल मुंबईत अभिनेता टायगर श्राफ यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला या घटनेचा मी निषेध करते पण महाराष्ट्रात क्राईम वाढला आहे असा केंद्रीय गृहमंत्रालयाचा रिपोर्ट आहे. स्व.बाबा सिद्दीकी यांचा पण अशा प्रकारे गोळीबारात दुर्दैवी मृत्यू झाला होता ते आरोपी अजूनही सापडले नाहीत. त्यांचा मुलगा सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. त्याने घटनेची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी व कुटुंबाला संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. सत्ताधारी पक्षातील लोकांची हि परिस्थिती आहे मग सामान्य नागरिकांचे काय असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला. वाढत असलेल्या महागाई व मायक्रो फायनान्स वसूली वरुन त्यांनी सरकारवर टीका केली.
What's Your Reaction?