पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीसाठी 10 डिसेंबर पर्यंत संधी....

 0
पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीसाठी 10 डिसेंबर पर्यंत संधी....

पदवीधर, शिक्षक मतदार नोंदणीसाठी अद्याप 10 डिसेंबरपर्यंत संधी

पुणे, दि.10(डि-24 न्यूज)- पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणीसाठी अद्याप 10 डिसेंबरपर्यंत संधी उपलब्ध आहे. त्यासाठी प्रपत्र 18 आणि 19 द्वारे मतदार नोंदणी करता येणार आहे. त्या अंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांवर उचित निर्णय घेऊन पात्र मतदारांचा समावेश 30 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार याद्यांमध्ये करण्यात येणार आहे.

शिक्षक, तसेच पदवीधर मतदारसंघासाठी ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणी करण्याची सुविधा https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पुढील वर्षी अपेक्षित आहेत. त्यासाठी 6 नोव्हेंबरपर्यंत पात्र पदवीधर आणि शिक्षकांकडून प्रपत्र 18 आणि 19 मध्ये प्राप्त झालेल्या अर्जावर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून पात्र, अपात्रतेचा निर्णय घेऊन त्याआधारे प्रारूप मतदार याद्या 25 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.त्यानंतर 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत या या|द्यांना अनुसरून दावे आणि हरकती सादर करता येणार आहेत. 6 नोव्हेंबर या दिनांकापर्यंत प्राप्त अर्जांच्या आधारे प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत.

ज्या पात्र पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी अद्याप मतदार नोंदणीसाठी अर्ज सादर केलेले नाही, त्यांनी मतदार नोंदणीसाठी आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक पात्रता, सोबत जोडावयाची कागदपत्रे याबाबतची माहिती संबंधित संकेतस्थळावर मॅन्युअल या शीर्षकाखाली उपलब्ध आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे, नागपूर, तसेच औरंगाबाद विभाग पदवीधर तसेच पुणे आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून या निवडणुका होणार आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow