पाणीपुरवठा योजनेत अडथळा निर्माण करणा-यांविरुध्द कडक कारवाई करणार - पोलिस आयुक्त प्रविण पवार
 
                                पाणीपुरवठा योजनेत अडथडा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध सक्त कारवाई करणार, पोलीस आयुक्त व मनपा प्रशासक
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज)
नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामात जे कोणी अडकाठी आणतील त्याला सोडणार नाही, त्याच्या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन आज पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी आज छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका आयुक्तता प्रशासक जी श्रीकांत यांच्या सोबत घेण्यात आलेली एक संयुक्त बैठकीत केले.
आज संध्याकाळी पोलीस मुख्यालय येथे पोलीस आयुक्त पवार यांनी नवीन पाणीपुरवठा योजना चे काम करणारे गुत्तेदार, संबंधित अधिकारी यांची बैठक घेतली.
या बैठकीत वर नमूद दोन्ही सनदी अधिकाऱ्यांनी ताकीद दिली की पाणीपुरवठा योजनेच्या कामात जे कोणी कोणत्याही स्वरूपाची अडचण आणतील त्याच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. पोलीस आयुक्त म्हणाले की जर कोणी कोणत्याही प्रकारचे कारणास्तव योजनेच्या कामात वाद घालतील किंवा काम थांबविण्यासाठी हिंसाचाराचा अवलंब करतील, त्यांना सोडला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
सदरील योजना माननीय उच्च न्यायालय यांच्या सूचनाप्रमाणे अविरत चालू राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी, ते म्हणाले. जर कोणी कोणत्याही कारणास्तव कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करून दिसला तर याची तक्रार संबंधित पोलीसकडे करावी, अशी सूचना त्यांनी गुत्तेदारांना यावेळी केली.
यावेळी प्रशासक जी श्रीकांत म्हणाले की संपूर्ण देशात फक्त तीन योजना अशी आहे ज्याची मॉनिटरिंग थेट पंतप्रधान यांचे कार्यालय मार्फत केली जात आहे. याच्यात कोयंबतूर, जगन्नाथ पुरी आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये नवीन पाणीपुरवठा योजना यांचा समावेश आहे.
सदरील योजना अतिशय महत्त्वकांक्षी असून कोणीही या योजनेत अडथळा आणू नये, अन्यथा त्यांच्या विरोधात सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
ते पुढे म्हणाले की पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्णता कडे वळत आहे, आता एक ते दोन किलोमीटर लाईन टाकण्याचे काम बाकी आहे. सदरील योजना पूर्ण होईपर्यंत कोणीही कायदा हातात घेऊ नये जर काही वाद झाला तर त्यांनी तो वाद कायदेशीर मार्गाने सोडवावे, ते म्हणाले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            