पाण्याच्या पाईपलाईनचे काम खोळंबल्याने रस्ते चिखलमय, मनसे अक्रामक

पाण्याच्या पाइपलाइनचे काम खोळंबल्याने रस्ते चिखलमय, मनसे अक्रामक...
पावसात अपघात होत असल्याचा आरोप...
म.जी.प्रा. चे जिव्हिपीआर कंपनीचे पुरविते जावई लाड...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) -
वार्ड क्रमांक 81 प्रबोधनकार ठाकरेनगर N -2 सिडको आज श्रावण महिना पहिला दिवस जवळ पास दिवसभर पावसाच्या सरी सुरु आहे. महाराष्ट्र जिवन प्राधिकरण, जिव्हिपिआर कंपनी व गुंड प्रवृत्तीचे राज्यकर्ते यांच्या कृपा आशीर्वादाने महालक्ष्मी चौक ते विनय कॉलनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान पाण्याची टाकी रोड, तसेच महालक्ष्मी चौक ते अंबिकानगर वरील विहंगम दृष्य दीड वर्षापासून जिव्हिपिआर कंपनीची अर्धवट कामे आजपर्यंत पूर्ण झालेली नाही. यामुळे वार्ड क्रमांक 81 मध्ये चांगले रस्ते वाटेल तिथे खोदून दोन वर्षा पूर्वी मनपा ने गुळगुळीत रस्ते तयार केले ते नवीन रस्ते संपुर्णपणे खराब करुन टाकले. मागील दीड वर्षांपासून संबंधित कॉन्ट्रॅक्टर जिव्हीपिआर कंपनी यांनी नवीन पाईप लाईन टाकण्यासाठी रस्ते खोदून टाकले. त्यात नवीन पाईप लाईन टाकून वरून माती टाकून काँक्रिट न करताच सोडून दिले महाराष्ट्र जीवन प्राधिकरण काय यांचे जावई लाड करीत आहेत पुरवीत आहे. आज या पावसामुळे संपूर्ण वार्ड चिखलमय झाला असून दोन चाकी गाड्या स्लिप होऊन जेष्ठ नागरिक व महिला दोन चाकी वरुण पडून इजा होत आहे. कितीतरी वेळा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना तक्रार दिली पाहणी झाली कोणाला तरी पाठवून तात्पुरते काम करुन निघुन जातात. कारण गुंड प्रवृत्तीचे राज्यकर्ते यांच्या त्रासाला कंटाळून पाठविलेले कामगार निघून जातात. हे पावसाचे साचलेले घाण पाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने व्हाल यासाठी सोडलेल्या पाईप कनेक्शन मध्ये जाऊन ते पाणी नवीन टाकलेल्या मेन पाईप लाईन मध्ये जाऊन तेच पाणी पुरवठा द्वारे नागरिकांना पुरवले जात असून वार्डातील नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे रोगराई सामना करावा लागत आहे. आज शहराला दोन दोन कॅबिनेटमंत्री आहे तरी शहराचे असे हाल होत आहे ही खुप मोठी शोकांतिका आहे. तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना कळकळीची विनंती आपण या जिव्हिपीआर कंपनीचे जावई लाड बंद करून लवकरात लवकर वार्डातील राहिलेली कामे पुर्ण करावी नसता महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना तर्फे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व याची संपुर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.
असा इशारा मनसेचे अशोक पवार पाटील जिल्हा संघटक महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना विभाग,
सतनामसिंग गुलाटी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मनसे, अशोक कराळे पाटील उपजिल्हा संघटक महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना, विजय रिडलॉन मनपा कामगार सेना मनसे, रुपेश शिंदे शहर उपाध्यक्ष पूर्व विधानसभा मनसे, विभाग अध्यक्ष रवींद्र गायकवाड पूर्व विधानसभा मनसे, अशोक आंबुलगेकर सदस्य एस.टी.मध्यवर्ती कार्यशाळा सहकारी गृह निर्माण संस्था मर्यादित N-2 सिडको, रमाकांत निकम पाटील एस.टी. मध्यवर्ती कार्यशाळा सहकारी गृह निर्माण संस्था मर्यादित N-2 सिडको, सतीश जाधव पाटील सामाजिक कार्यकर्ते, प्रमोद कुंटे पाटील सामाजिक कार्यकर्ते, अमित जैस्वाल शहर उपाध्यक्ष पूर्व विधानसभा मनसे, मोनु तुसे शहर उपाध्यक्ष पश्चिम विधानसभा मनसे, ऋषी शिनगारे पाटील महाराष्ट्र सैनिक, विश्वजीत देशमुख महाराष्ट्र सैनिक, गोपाळ आवारे पाटील यांनी दिला आहे.
What's Your Reaction?






