पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू करा नाही तर तुमच्या कार्यालयावर आंदोलन करु...!
 
                                मुकुंदवाडी राजनगरच्या पाईपलाईनचे काम सुरू करा नाहीतर तुमच्या कार्यालयावर आंदोलने करू...
औरंगाबाद, दि.6(डि-24 न्यूज) वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पूर्व शहराध्यक्ष मतीन पटेल यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला निवेदन देण्यात आले. राजनगर मुकुंदवाडी येथील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम जवळपास ऑगस्ट महिन्यापासून बंद करण्यात आलेले आहे. शहरातील सर्व ठिकाणी आपले कामे सुरळीतपणे सुरू आहेत परंतु जगताप शाळेजवळ राजनगर येथील दलित वसाहत असल्यामुळे आपल्या कार्यालयामार्फत हेतूपुरस्कर काम बंद केलेले आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला.
आज देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे प्रशासनाला चार दिवसात प्रत्यक्षात कार्यवाही होऊन पाईपलाईनचे काम सुरू न केल्यास कार्यालयावर भव्य निदर्शने व आंदोलने करण्याचा इशारा देण्यात आला आहे सदरील आंदोलन निदर्शनात कुठल्याही प्रकारची हानी झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासकीय कार्यालयाची असेल असे नमूद करण्यात आले.
निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश गुलाबराव बन शहर उपाध्यक्ष आसिफ खान शहर महासचिव सतीश राणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            