पी.एम.किसान योजनेतील लाभार्थ्यांनी 30 जून पूर्वी ई-केवायसी पूर्ण करावे...!

 0
पी.एम.किसान योजनेतील लाभार्थ्यांनी 30 जून पूर्वी ई-केवायसी पूर्ण करावे...!

पी.एम. किसान योजनेतील लाभार्थ्यांनी 30 जूनपूर्वी ई-केवायसी पूर्ण करावे

छत्रपती संभाजीनगर , दि.10(डि-24 न्यूज) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने दिली जाते. या योजनेतील लाभ केवळ पात्र आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र शासनाने सर्व लाभार्थ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी (e-KYC) प्रमाणीकरण अनिवार्य केले आहे.

पी.एम. किसान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी 30 जून 2026 पूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक असून, अन्यथा आगामी हप्त्याचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. शासनाच्या निर्देशानुसार 100 टक्के ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

लाभार्थी शेतकरी आपल्या जवळच्या सामाईक सेवा केंद्रात (CSC) जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे किंवा पी.एम. किसान मोबाईल ॲपवरील फेस ऑथेंटिकेशन सुविधेच्या माध्यमातून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. या दोन्ही पद्धतींपैकी कोणत्याही एका पद्धतीचा वापर करून प्रमाणीकरण करता येणार आहे.

ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (VNOs) आणि क्षेत्रीय कर्मचारी यांच्या सहकार्याने गावागावात पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्यांना मोबाईल वापरण्यात किंवा तांत्रिक प्रक्रियेत अडचणी येत आहेत, त्यांनी ग्रामस्तरीय नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने केले आहे.

ई-केवायसीच्या अभावी कोणताही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow