पुसेसावळी दंगलीतील सुत्रधार आतापर्यंत मोकाट, एमआयएमने केले धरणे आंदोलन
पुसेसावळी दंगलीचा सुत्रधार विक्रम पावसकर मोकाट कसा, एमआयएमचे तीव्र धरणे आंदोलन
औरंगाबाद, दि.10(डि-24 न्यूज) सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात उसळलेल्या दंगलीचा सुत्रधार भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर अजूनही मोकाटच असल्याने त्यांचेवर आतापर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने एमआयएम अक्रामक झाली आहे. या दंगलीत नरुल हसन या निष्पाप युवकाचा नाहक बळी गेला. 13 लोक गंभीर जखमी झाले. धार्मिक स्थळावर हल्ला करुन नुकसान करण्यात आले. दुकानांची तोडफोड, दगडफेक व जाळपोळ जमावाने केले. त्या जमावावर जाणूनबुजून पोलिसांनी कारवाई केली नाही हलगर्जीपणा मुळे दंगल झाली. आक्षेपार्ह पोस्टची अगोदरच चौकशी करून कारवाई केली असती तर हि दंगल झाली नसती. वेळोवेळी दोषींवर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले तरीही कार्यवाही होत नसल्याने एम आय एम च्या वतीने राज्यात धरणे आंदोलन करुन मागणीचे निवेदन दिले.
आज दुपारी प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.गफ्फार कादरी यांच्या नेतृत्वाखाली दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. दलित व मुस्लीम समाजावर वाढत असलेले अत्याचार यांबाबत नेत्यांनी यावेळी भाषणे केली. शिष्टमंडळाने आपल्या मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त यांना सादर केले.
निवेदनात म्हटले आहे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे, डीसिपि सातारा व संबंधित अधिकारी यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कार्यवाही करावी, मृत पावलेल्या नरुल हसन यांच्या कुटुंबातील एक कोटी मोबदला व त्यांच्या विधवा पत्नीला शासकीय नोकरी द्यावी, धार्मिक स्थळाचे झालेले नुकसान जळालेल्या वाहन व दुकानांची नुकसान भरपाई द्यावी. जखमी व्यक्तीला प्रत्येकी एक लाख मोबदला द्यावा अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, नासेर सिद्दीकी, फेरोज खान, आरेफ हुसेनी, शेख रफीक, शेख अहेमद, अब्दुल अजीम,मोहंमद असरार, एम.एम.शेख, मोनिका मोरे , काकासाहेब काकडे, दस्तगीर शेख, शोएब पठाण, इम्तियाज भाई, जोहरा बाजी, जकी भाई आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?