पूर्व मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांची प्रभावी पदयात्रा

 0
पूर्व मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांची प्रभावी पदयात्रा

पूर्व मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्री अतुल सावे यांची प्रभावी पदयात्रा; 

नागरिकांशी संवाद साधत दिला प्रचारावर जोर

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री अतुल सावे यांनी पूर्व मतदारसंघात प्रचाराच्या जोरदार मोहिमेला प्रारंभ केला आहे. मंगळवारी सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही सत्रात त्यांनी चार वॉर्डांतून प्रभावी पदयात्रा काढून स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला. "सबको भावे अतुल सावे" अशा घोषणांनी परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले.

श्री अतुल सावे यांनी आपल्या प्रचाराला सिडको मंडळातील एन-7 अयोध्या नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात केली. पुढे माता मंदिर चौक, डफळ यांचे घर ते किरण भगूरे यांचे घर, मारुती मंदिर, मसलेकर दवाखाना, योगेश भाकरे यांचे घर, महादेव मंदिर एन-7, राम मंदिर मार्ग, एन-7 जी-1 सेक्टर आदी ठिकाणांवर थांबून नागरिकांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान मतदारांच्या समस्या समजून घेऊन, त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. मतदारसंघातील विविध विकास कामे तसेच भविष्यातील योजना त्यांनी जनतेसमोर मांडल्या.

श्री सावे यांचे प्रचार तंत्र म्हणजे केवळ सभांवर आधारित न राहता, घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संपर्क साधणे. "कमळ" चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करताना त्यांनी मतदारांना राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी राज्यात राबविलेल्या विविध योजना आणि विकासाची दिशा समजावून सांगितली. "राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला विकासाच्या नव्या संधी उभ्या करायच्या आहेत आणि जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरण्याचे आमचे वचन आहे," असे त्यांनी ठामपणे सांगितले.

या पदयात्रेत शिवाजी दांडगे, किरण पाटील, राजेश मिरकर, गणेश नावंदर, अरुण पालवे, राहुल खरात, माधुरी अदवंत, रेखा ताई पाटील, नितीन खरात, रामचंद्र जाधव, सतीश खेडकर, गणेश जोशी, वर्षा साळुंके, सरिता घोडतुरे, ताराचंद गायकवाड, अमेय देशमुख, योगेश भाकरे, कैलास राऊत, यांच्यासह महायुतीतील विविध घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांनी श्री सावे यांचा प्रचार वाढवण्यास मदत केली आणि या पदयात्रेत एकजूट दाखवली. स्थानिक नागरिकांमधील उत्साह आणि मोठ्या प्रमाणातील सहभागाने श्री सावे यांच्या विजयाची शक्यता आणखी बळकट झाल्याचे दिसत आहे.

श्री अतुल सावे यांच्या नेतृत्वात महायुतीने जनतेचे मते जिंकण्यासाठी वेगवान प्रचाराचे धोरण अवलंबले आहे. श्री सावे यांचे मतदारांशी थेट संवाद साधण्याचे तंत्र आणि त्यांच्या गाठी-भेटींमुळे मतदारसंघात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे महायुतीच्या विजयाचा विश्वास आणखी वाढला आहे.

जयभवानी नगरमध्ये पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद..

सायंकाळी जय भवानी नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पदयात्रेला सुरुवात केली. ही यात्रा मोदक हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दीपक स्टेशनरी, ते रवी योजना हनुमान मंदिर, गल्ली नंबर सहा, गल्ली नंबर सात, गल्ली नंबर नऊ आदी भागात काढण्यात आली होती. यावेळी प्रा. गोविंद केंद्रे, शिवाजी दांडगे, लक्ष्मीकांत थेठे, गजानन मनगटे, दामू अण्णा शिंदे, बालाजी मुंडे, मंगलमूर्ती शास्त्री, रामेश्वर दसपुते, अरुण पालवे, धीरज केंद्रे, श्रीकांत घुले, ताराचंद गायकवाड, शैलेश हेकाडे, चंद्रकांत हिवराळे यांच्या सह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नागरिकांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow