पोलिस अधीक्षक यांना सक्तीच्या रजेवर पाठवणे निषेधार्थ, विभागीय आयुक्त यांना निवेदन
पोलिस अधिक्षक जालना यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निषेधार्थ पोलीस हक्क संघर्ष संघटना चे विभागीय आयुक्त यांना निवेदन
पोलिस अधीक्षक जालना यांना सक्तीचे रजेवर पाठवण्याचा निर्णय परत घ्या .....!
नजीमोद्दीन काजी -
औरंगाबाद, दि. 7 (डि-24 न्यूज) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलन करीत असताना आंदोलन करते आणि पोलिसांमध्ये वाद होवून आंदोलन चिघळले असल्यामूळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला होता. आंदोलनावर लाठीमार का केला म्हणून जालना जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांना सक्तीचे रजेवर पाठवण्यात आले आहे. अप्पर पोलिस अधीक्षक / पोलीस उप अधीक्षक यांची बदली करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक दर्जाचे अधिकारी लोकांना सक्तीचे रजेवर पाठवून पोलीस आधिक्षक यांचा अपमान करण्याचा आला आहे. पोलिस अधीक्षक दर्जाचे अधिकारी यांना सक्तीचे रजेवर पाठवून महाराष्ट्र पोलिस दलाचे खाच्चिकरण खुद्द राज्य सरकार कडून झाले आहे.
लाठीमार केला तर का केला.......?
लाठीमार नाही केला तर का नाही केला.....? दोन्ही बाजू कडून पोलिस अधिकारी लोकांनां जाब द्यावां लागतो.
पोलिस अधिकारी / पोलीस कर्मचारी लोकांनीं कायदा व सूव्यवस्था कशी अबाधित ठेवावी असा प्रश्न निर्माण होतो.
पोलिस हक्क संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेने सक्तीचे रजेवर पाठवण्याचा निषेध करून एक निवेदन विभागीय आयुक्त यांना देण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक जालना यांचे सह पोलीस अधिकारी लोकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय परत घेण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
पोलिस हक्क संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य चे निवेदनावर राष्ट्रीय सचिव जरयाब शेख , राज्य सचिव नजीमोद्दीन काझी, शहर अध्यक्ष सैय्यद अश्फाक अली , महीला आघाडीचे सलमा नाहीद , शफीया परवीन यांच्या सह्या आहेत.
What's Your Reaction?