प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रदीप जैस्वाल यांचे वाहन रॅली काढून शक्तीप्रदर्शन

 0
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रदीप जैस्वाल यांचे वाहन रॅली काढून शक्तीप्रदर्शन

प्रदीप जैस्वाल यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, हजारो वाहनांच्या भव्य रॅलीने प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचाराचा शेवट

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) 

मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एक भव्य आणि शक्तिशाली वाहन रॅली काढून आपला प्रचार समारोप केला. या रॅलीत हजारो दुचाकी, चारचाकी वाहनं आणि महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीतून प्रदीप जैस्वाल यांनी एक मजबूत संदेश देत विरोधकांना धडकी भरवली.

मध्य मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रदीप जैस्वाल यांनी एक भव्य वाहन रॅली आयोजित केली होती. या रॅलीला ‘आ देखे जरा, किसमें कितना है दम’ या घोषवाक्याने एक जबरदस्त रंग दिला आणि त्याने सर्वच क्षेत्रातील नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. रॅलीची सुरुवात शहराच्या प्रमुख स्थानांपैकी एक असलेल्या क्रांतिचौकपासून दुपारी 12 वाजता झाली. रॅलीत सहभागी झालेल्या हजारो वाहनांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांची भरपूर संख्या होती. रॅलीत महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. रॅलीची शोभा वाढवणारे बॅनर, झेंडे आणि घोषवाक्यांनी वातावरण रंगून गेल होतं. वाहन रॅलीच्या मार्गावर विविध भागात नागरिकांनी रॅलीच उत्स्फूर्तपणे स्वागत केलं आणि प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारास प्रचंड समर्थन दिलं. रॅलीत मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या जात होत्या, ज्यामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. रॅलीचे रुख मध्य मतदारसंघाच्या विविध भागांमधून जात होते आणि या रॅलीने प्रत्येक वॉर्डमध्ये प्रदीप जैस्वाल यांच्या विजयी प्रतिमेचा ठसा उमटवला.

 रॅलीच्या अखेरीस प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचार कार्यालयात या भव्य वाहन रॅलीचा समारोप झाला. यावेळी प्रदीप जैस्वाल यांनी संबोधित करतांना सर्व नागरिकांना मतदानाच्या महत्त्वाचे भान दिलं आणि त्यांना आवाहन केलं की, त्यांना निवडून आणण्यासाठी मोठ्या मताधिक्याने मतदान करा. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “आपण सर्व एकत्र येऊन ज्या प्रकारे शक्तीप्रदर्शन केलं आहे, त्याचप्रकारे मतदान करून आपला विजय निश्चित करा. या वाहन रॅलीला किशनचंद तनवाणी, संजय केणेकर, आमेर जैतपुरवला, विश्वनाथ राजपुत, कय्युम शेख यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित

होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow