प्रभाग क्रमांक 12 मधून सय्यद हमीद राष्ट्रवादीचे उमेदवार, प्रभागात उत्साह व जल्लोष...
प्रभाग 12 मधून सय्यद हमीद राष्ट्रवादीचे उमेदवार, प्रभागात उत्साह...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) - मागिल अनेक वर्षांपासून समाजसेवा व राजकारणात सक्रिय असलेले सय्यद हमीद यांना प्रभाग 6, कटकट गेट, किराडपूरा, शरीफ काॅलनी, रहेमानिया काॅलनी भाग येथून राष्ट्रवादी (अजित पवार गट)पार्टीने अधिकृत उमेदवारी दिल्याने मतदारांनी स्वागत केले आहे. उच्चशिक्षित व नवीन चेहरा मैदानात उतरल्याने युवा, जेष्ठ नागरिक व महीला भगिनी, विद्यार्थी वर्गाला अपेक्षित काम करणारा उमेदवार दिला असल्याने या प्रभागात परिवर्तन अटळ आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस किसान सेलचे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. कटकट गेट व परिसरात त्यांच्या दिव्यांगांसाठी विशेष शाळा, प्राथमिक व माध्यमिक शाळा काॅलेज मध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सन 2015 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या कुटुंबातील उमेदवाराने एमआयएमला नाकीनऊ आणले होते. त्यावेळी दुस-या नंबरची मते त्यांना मिळाली होती. या निवडणुकीत या प्रभागात किराडपुरा आहे व सय्यद हमीद यांचे निवासस्थान कटकट गेट, बाबर काॅलनी येथे असल्याने त्यांचा विजय नक्की होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
What's Your Reaction?