प्रभाग क्रमांक 6 मध्ये इत्तेहाद पॅनलची एमआयएमशी काट्याची टक्कर, रॅलीला अभुतपुर्व प्रतिसाद...
इत्तेहाद पॅनलची एमआयएमशी काट्याची टक्कर...?, प्रचार रैलीला अभूतपूर्व प्रतिसाद... एमआयएमने एमआयएम समोर उभे केले आव्हान, विजयासाठी अटीतटीचा मुकाबला होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) - माजी नगरसेवक अयूब खान व आरेफ हुसैनी यांना एमआयएमने तिकीट नाकारल्याने दोघांनी एजाज झैदी व पप्पू कलानी यांना सोबत घेऊन प्रभाग क्रमांक 6 मधून इत्तेहाद पॅनल बनवून महापालिका निवडणुकीत उडी घेतली. प्राचारात या इत्तेहाद पॅनलला मतदारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी इत्तेहाद पॅनलने अभुतपुर्व रॅली काढल्याने या निवडणुकीत एमआयएमची काट्याची टक्कर थेट या प्रभागात होईल अशी चर्चा बुढीलेन, लोटा कारंजा, शहा बाजार, टाईम्स काॅलनी, सदफ काॅलनी, चाऊस काॅलनी येथे सुरू झाली आहे. दुपारी एक वाजता हि रॅली बुढीलेन येथून सुरू होऊन लोटा कारंजा, शहा बाजार, चंपा चौक मार्गे टाईम्स काॅलनी येथे समारोप झाला. इत्तेहाद पॅनलचे उमेदवार अयूब खान, सय्यदा निखत परवीन एजाज झैदी, खान शाहजहाँ अजहर, पप्पू कलानी व आरेफ हुसैनी यांनी खुली जीपमध्ये बसून मतदारांना मते मागितली. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात त्यांचे परिसरात जंगी स्वागत करण्यात आले. मोठ्या संख्येने जनसमुदाय रॅलीत सहभागी झाला होता.
What's Your Reaction?